Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 जून 2021 गुरुवार | ABP Majha
1. राज्यात बुधवारी 10 हजार 107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 237 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
2. खबरदारी न घेतल्यास दोन महिन्यांत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळं चिंता वाढली
3. कोविन अॅपवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अनिवार्य नाही, केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करता येणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
4. मराठा समन्वयकांसह खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार, मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास लोकप्रतिनिधी जबाबदार, उदयनराजेंचा इशारा
5. आरक्षणासाठी ओबीसी संघटनाही आक्रमक, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा सरकारचा निर्णय
6. अयोध्येतील जमिनीच्या वादावरुन झालेल्या राड्याप्रकरणी शिवसेनेच्या 7 तर भाजयुमोच्या 30 लोकांवर गुन्हा
7. मुंबईकरांवर करवाढीची टांगती तलवार, स्थायी समितीसमोर 14 टक्के मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव, भाजपचा विरोध
8. आधारकार्ड पीएफ खात्याला लिंक करण्याची मुदत वाढवली 1 सप्टेंबरर्यंत आधार लिंक करणे बंधनकारक
9. भारतातल्या बड्या आयटी कंपन्यांमधल्या 30 लाख कर्मचाऱ्यांची नोकरी ऑटोमेशनमुळं धोक्यात, बँक ऑफ अमेरिकेचा अहवाल
10. जालन्यात बनी नदीच्या पुरात दोन जण वाहून गेले तर काल रत्नागिरीत पालशेतचा पूल पाण्याखाली गेल्यानं 12 गावांचा संपर्क तुटला