2. विकासाच्या कामांबाबत आघाडी सरकारच्या काळात उदासिनता, नाव न घेता उदयनराजेंचं पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र, मेगागळतीवरुन आत्मचिंतन करण्याचा पलटवार
3. भाजपची महाजनादेश यात्रा आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात, संध्याकाळी 6 वाजता इचलकरंजीत तर 8 वाजता कोल्हापुरात जाहीर सभा
4. पळपुट्या नेत्यांचा जनताच समाचार घेईल, भाजपमधील मेगाभरतीवर शरद पवारांचा टोला, पवार आज नाशिक दौऱ्यावर
5. साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार नाही, पक्षाने तिकीट दिल्यास कराडमधूनच विधानसभा लढवणार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण
6. पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेतील कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार, 22 सप्टेंबरला टेक्सासमधील ह्युस्टनमध्ये दोन्ही नेते संबोधित करणार
7. पब्जी गेममुळे कोल्हापुरातील तरुणाचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं, रुग्णालयात दाखल करण्याची वेळ, तरुण पब्जीच्याच भाषेत बोलत असल्याचा धक्कादायक प्रकार
8. झीरो बॅलन्स खात्यांवर आयसीआयसीआय बँकेचा बडगा, रोकड काढल्यास अथवा भरल्यास 100 ते 125 रुपयापर्यंत शुल्क आकारलं जाणार
9. पावसामुळे भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी सामना रद्द, पुढील सामना 18 सप्टेंबर रोजी मोहालीत खेळवणार
10. अखेरच्या अॅशेस कसोटीत इंग्लंडची सरशी, इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर 135 धावांनी मात, मालिका 2-2 अशी बरोबरीत, 1972 नंतर पहिल्यांदाच अॅशेस मालिका अनिर्णित