1. कोल्हापुरात कोरोना संशयित वृद्ध नागरिकाचा मृत्यू, 8 मार्च ते 15 मार्च दरम्यान हरियाणा,दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर केलेला टॅक्सीने प्रवास


2. राज्यात 33 कोरोनाग्रस्त, पुण्यातल्या रुग्णांची संख्या 16 वर, गरज असेल तरच घराबाहेर पडा, विभागीय आयुक्तांचं पुणेकरांना आवाहन


3. राज्यभरातली चित्रपटगृहं, व्यायामशाळा, स्विमिंग पूल 31 मार्चपर्यंत बंद, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी, मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू


4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई, औरंगाबादमधील वाळूज परिसरातून 50 लाखांचं बनावट सॅनिटायझर जप्त


5. कस्तुरबापाठोपाठ केईएम रूग्णालयात बुधवारनंतर कोरोनाच्या चाचण्या होणार, लवकरच 250 नमुने तपासणी करणारी यंत्रणा आणणार


Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 मार्च 2020 | सोमवार | ABP Majha



6. प्रशासनाचा आदेश धुडकावून शिर्डीत साई परिक्रमा यात्रा, आयोजकांवर गुन्हा दाखल, मंत्री छगन भुजबळांचाही पुण्यात जाहीर कार्यक्रम, तर चंद्रकांत पाटलांकडूनही पदाधिकाऱ्यांची बैठक


7. कोरोनाची माहिती लपवल्याप्रकरणी देशातील पहिल्या गुन्ह्याची नोंद, देशातील पहिला फौजदारी गुन्हा आग्रा पोलिसांनी नोंदविला


8. कोरोनामुळे स्पेनमध्ये 24 तासात 100 हून अधिकांचा मृत्यू तर 2 हजार जणांना कोरोनाची लागण, तर याघडीला स्पेनमध्ये 7753 कोरोनाग्रस्त


9. परदेशातून येणाऱ्या संशयितांसाठी पनवेलमध्ये कॉरेंनटाईन सेंटर उघडण्याचे आदेश, भीतीनं मनपा कर्मचाऱ्यांचं पलायन, गुन्हा दाखल होणार


10. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ मध्यरात्री राज्यपाल लालजी टंडन यांच्या भेटीला, आजच्या बहुमत चाचणीवर सस्पेन्स कायम