Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 15 नोव्हेंबर 2021 : सोमवार : ABP Majha


दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो


 


1. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन, वयाच्या शंभराव्या वर्षी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास, सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार

2. कार्तिकी एकादशीनिमित्त सजली पंढरी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पडली शासकीय पूजा, नांदेडमधील निळा गावचे टोणगे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी


 


3. राज्य सरकार सध्या तरी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याच्या मानसिकतेत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य

4. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज नववा दिवस, अवमान याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी, रविवारी जवळपास ४ हजार कर्मचारी कामावर रुजू


 


5. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा इशारा, कोकण-पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज, मोठय़ा प्रतीक्षेनंतर अवतरलेल्या थंडीची हुलकावणी


 


6. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, आमदार झिशान सिद्दकींचा भाई जगताप, सूरज ठाकूरांबरोबर वाद, आंदोलनातून झिशान सिद्धिकींचा काढता पाय


 


7. भारत देश कधीही हिरवा होणार नाही, नेहमीच भगवा राहणार, विक्रम गोखलेंचं वादग्रस्त विधान, तर कंगनाच्या स्वातंत्र्याबद्दलच्या विधानाचंही समर्थन, तर काँग्रेसकडून टीकास्त्र


 


8. रेल्वे आरक्षण सुविधा पुढील सात दिवस दररोज सहा तास बंद राहणार, तिकीट यंत्रणा कोरोना पूर्वीप्रमाणे करण्यासाठी रेल्वेचा निर्णय


 


9. अंबरनाथच्या चिखलोली धरणात दोन मुलं बुडाली, अंधार पडल्यानं शोधकार्य थांबवलं, पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघं बुडाले




10. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाचा विजेता, न्यूझीलंडचा 8 गडी राखून धुव्वा उडवत पटकावले जेतेपद, मार्श-वॉर्नर विजयाचे शिल्पकार