Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 ऑगस्ट 2021 रविवार | ABP Majha
1. भारताच्या विकासाची वेळ आलीय, सामर्थ्याच्या पूर्ण वापर ही काळाची गरज, स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदींचं देशवासियांना संबोधन
2. पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी आतापासून खबरदारी घ्या, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन
3. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट, राजधानी दिल्लीला छावणीचं स्वरुप, मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी, तर श्रीनगरवर ड्रोनची नजर
4. उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार राष्ट्रपती पोलीस पदकं, 25 शौर्य पदकं तर प्रशंसनीय सेवेकरिता 45 पदकं जाहीर
5. लसीकरणानंतर 14 दिवस झालेल्यांची आजपासून लोकलवारी सुरु, मॉल्स आणि हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार
6. दोन डोस घेतलेल्यांपैकी 10 जणांना डेल्टा प्लसची लागण झाल्यानं चिंता वाढली, राज्यभरात डेल्टा प्लसचे एकूण 66 रुग्ण
7. रस्ते निर्मितीच्या कामात लोकप्रतिनिधीच स्पीडब्रेकर ठरत असल्याची गडकरींची मुख्यमंत्र्याकडे तक्रार, या प्रकरणी मुख्य सचिव अहवाल सादर करणार
8. तिवरे गावावर पुन्हां एकदा आस्मानी संकट; गावातील तिन्ही बाजूच्या डोंगराची माती खाली सरकली, हजारो हेक्टर शेती मातीमोल
9. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या कार्यालयाबाहेरील सुमोमध्ये स्फोटकं नव्हे तर फटाके, मात्र आमदारांकडून घातपाताच्या कटाची शक्यता व्यक्त
10. अफगाणी शरणार्थींना भारतात आश्रय मिळण्याची शक्यता, भारत सरकार सकारात्मक विचार करत असल्याची सूत्रांची माहिती