Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 एप्रिल 2021 | बुधवार | ABP Majha

1. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी, निर्धारित वेळेसाठी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, तर मंदिर, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मात्र बंद 

2. संचारबंदीच्या काळात 7 कोटी जनतेला मोफत धान्य, तर गरजूंना एक महिन्यासाठी मोफत शिवभोजन थाळी; रिक्षाचालक, अधिकृत फेरीवाले त्याचसोबत आदिवासींसाठीही पॅकेज जाहीर 

3. सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाला ब्रेक, फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार, अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई होणार 

4. 'मुख्यमंत्र्यांचं भाषण गोंधळात टाकणारं,' भाजपचा टोला; मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लावताना जनतेच्या तोंडाला पाने पुसली, चंद्रकांत पाटील यांची टीका

5. परदेशातील लसींचा लवकरात लवकर वापर सुरु करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचं मोठं पाऊल, भारतातील मानवी चाचण्यांचा टप्पा वगळण्याचा निर्णय 

6. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आजपासून सीबीआय चौकशी, परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी प्रश्नांची सरबत्ती होणार  

7. नक्षलग्रस्त गडचिरोतील फोंडाघाटमध्ये पायाला चिठ्ठ्या बांधलेले कबुतर जप्त, चिठ्ठीतील सांकेतिक भाषेमुळे संशयाचं वलय वाढलं 

8. नागपुरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईकांकडून तोडफोड, गेल्या तीन दिवसातील दुसरी घटना; वर्ध्यातही रुग्णाच्या नातलगाची डॉक्टरला मारहाण

9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130वी जयंती, महामानवाला एबीपी माझाकडून अभिवादन, चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं राज्य सरकारचं आवाहन

10. पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात, मुस्लीम बांधवांचा आज पहिला रोजा, घरातच नमाज पठण करण्याचे प्रशासनाचे आवाहन