1. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाचा आक्षेप, भारताकडूनही सडेतोड उत्तर
2. सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील करकपातीच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी, गगनाला भिडलेले खाद्य तेलाचे दर कमी होण्याची शक्यता
3. क्रूझ पार्टी प्रकरणी एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारे नवाब मलिक आज नवीन गौप्यस्फोट करणार, तर आर्यन खानच्या जामीनावर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी
Cruise Drug Case : गेल्या 7 दिवसांपासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंद असलेला आर्यन खानवर आरोपांचं सत्र सुरुच आहे. क्रूझ ड्रग केस प्रकरणी जेलमध्ये असलेल्या आर्यन खानच्या आडचणी आणखी वाढणार की, जामीन मिळणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. काल (बुधवारी) आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी वेळी एनसीबीनं कोर्टात स्पष्टीकरण दिलं. आर्यन खानची समाजातील प्रतिष्ठा पाहता, तो बाहेर आल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. तसेच आपलं वजन वापरून त्याच्यावतीनं पुराव्यांशी छेडछाड आणि अन्य साक्षीदारांवर दबावही आणला जाऊ शकतो, असा दावा करत एनसीबीनं बुधवारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.
4.शिवरायांना हार घालण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार थेट पुतळ्यावर, वादग्रस्त व्हिडीओनंतर आमदार राजू नवघरेंना रडू कोसळलं
5. साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला आजपासून सुरुवात, सकाळच्या काकड आरतीनंतर ग्रंथ मिरवणूक, यंदाच्या दसऱ्याला साईबाबांचं दर्शन घेता येणार
6. भिवंडीतील काँग्रेस नगरसेवकाला 50 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक, कारवाई टाळण्यासाठी व्यापाऱ्यांकडे दोन कोटींची लाच मागितल्याचा आरोप
7. CIDCOचा तुघलकी निर्णय, घर लाभार्थ्यांकडून 4 लाखापर्यंत अधिकची वसूली, कार्यालयीन दिरंगाईचा भूर्दंड लाभार्थ्यांच्या माथी
8. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालो नाही तर ओबीसीचं प्रतिनिधित्व दिसणार नाही, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आता भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले नाही आणि सरकारला नाक दाबून तोंड उघडायला भाग पाडले नाही तर येणाऱ्या पाच वर्षात नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये ओबीसीच प्रतिनिधित्व दिसणार नाही असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. ते नागपुरात भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी जागर मेळाव्यात बोलत होते.
9 . माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली; AIIMS मध्ये दाखल
10. टी 20 विश्वचषकासाठी अक्षर पटेलऐवजी शार्दूल ठाकूरला संधी, बीसीसीआयकडून टीम इंडियाची नवी जर्सीही लॉन्च