1. १३ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर एनआयएकडून पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक, आज कोर्टात हजर करणार, अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी पहिली कारवाई, ठाण्यातून आणखी तीन जणांच्या अटकेची शक्यता


 



  1. सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा, महाविकास आघाडीचा चेहरा उघड झाल्याचं म्हणत हल्लाबोल


 



  1. पहाटे साडेतीनच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयाबाहेर आलेल्या इनोव्हा कारमुळे चर्चांना उधाण, अंबानींच्या घराबाहेर देखील आढळली होती पांढऱ्या रंगाची इनोव्हा


 



  1. लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका, हा शेवटचा इशारा, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं, नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन


 



  1. काल दिवसभरात राज्यात १५,६०२ कोरोनाग्रस्तांची नोंद, तर ८८ रुग्णांचा मृत्यू, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरची चिंता वाढली


 




  1. मुंबई विद्यापीठाचा 2021-22 या वर्षाचा 724 कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प अधिवेशनात सादर


 



  1. पुण्यात शिजणार तब्बल सात हजार किलो पुणेरी मिसळ, सुर्यदत्ता-विष्णू महामिसळ 2021 कार्यक्रमात 30 हजार गरजूंना होणार वाटप


 



  1. श्रीलंकेत बुरख्याला बंदी, तर एक हजाराहून अधिक मदरशांना टाळं, तीव्र पडसाद उमटण्याची चिन्ह


 



  1. युवराज सिंहचा पुन्हा एकदा सहा षटकारांचा धमाका, इंडियन लिजेंड्सकडून खेळताना दिला जुन्या आठवणींना उजाळा


 



  1. पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 10 संघ सहभागी होणार, दोन संघांसाठी मे महिन्यात लिलाव