1. राज्यात काल 60 हजार 226 रुग्णांची कोरोनावर मात, मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 91 टक्क्यांवर, तर रुग्ण दुपटीचा कालावधी 153 दिवसांपर्यंत पोहचल्यानं दिलासा

 

Continues below advertisement

  1. सगळ्याच गोष्टीत झेंडे, बोर्ड लावू नका! ; मंत्री नितीन गडकरी यांनी टोचले भाजप नेत्यांचे कान

 

  1. सर्वोच्च न्यायालयात आज कोरोनाशी संबंधित 21 याचिकांवर सुनावणी, राज्यांना लस मोफत की विकत मिळणार यावर निर्णय अपेक्षित

 

Continues below advertisement

  1. देशात कोरोना लसीकरणानं गाठला 17 कोटींचा टप्पा, मागील 24 तासात 20 लाख लोकांना लस

 

  1. होम क्वारंटाईनसाठी केंद्र सरकारची नवी नियमावली, 8 तासांनंतर मास्क बदलणं गरजेचं ; रुग्णालयांशी नियमित संपर्क राहण्याच्याही सूचना

 

  1. दिल्लीसह उत्तर प्रदेशात आठवडाभरासाठी लॉकडाऊनमध्ये वाढ ; तर राजस्थान, तामिळनाडू कर्नाटकात 24 मे पर्यंत पूर्ण लॉकडाऊन

 

  1. चीनच कोरोना व्हायरसचा निर्माता असल्याचे पुरावे, मोठे षडयंत्र असल्याचा अमेरिकन तपास यंत्रणांचा दावा, सहा वर्षांपासून चीनकडून तिसऱ्या महायुद्धाची तयारी

 

  1. देशातली पहिली महिला मिलिटरी पोलिसांची तुकडी कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज, 83 रणरागिणींना 61 आठवड्यांचं कठोर प्रशिक्षण

 

  1. राज्यात अनेक ठिकाणी 'अवकाळी'चा तडाखा, कुठं शेतीचं मोठं नुकसान तर कुठं वीज पडून जीवितहानी

 

  1. मातृ दिनी काळाचा घाला! मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेणाऱ्या आईचाही मृत्यू, बीडमधील हृदयद्रावक घटना