1. करुणा शर्मांच्या कारमध्ये आढळलेल्या पिस्तुल प्रकरणाला संशयाचं वलय, कारभोवती घुटमळणाऱ्या महिलांचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती, करुणा शर्मांवर अट्रॉसिटीचा गुन्हा 


2. कोरोना नियमांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तिलांजली, जुन्नर आणि डोंबिवलीतील कार्यक्रमात गर्दी, तर गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी जनतेकडूनही नियमभंग 


3. पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा अलर्ट, मराठवाड्याला मुसळधार पावसानं झोडपलं, बीड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद; जालना, परभणी, हिंगोलीत नदी-नाले तुडुंब 


4. बैलपोळ्यानिमित्तानं काल बैलांच्या खांदेशेकणीनंतर आज गोडाचा नैवेद्य, कोरोना संकटात साधेपणानं पोळा साजरा करण्याचं प्रशासनाचं आवाहन 


5. बेळगावात महापालिका निवडणुकीचा आज निकाल, महाराष्ट्र एकीकरण समितीचं मराठी उमेदवारांच्या कामगिरीकडे लक्ष, एबीपी माझाचं थेट बेळगावातून कव्हरेज 


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 06 सप्टेंबर 2021 : सोमवार : ABP Majha



6. मुंबईत डेंग्यू, मलेरियाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महानगरपालिका सतर्क, ड्रोनद्वारे जंतुनाशक फवारणी, महापौर किशोरी पेडणेकरही राहणार उपस्थित 


7. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजू शेट्टींचा एल्गार, कार्यकर्त्यांच्या नदीत उड्या, आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक


8. पंजशीरमध्ये अहमद मसूर गटाविरोधात तालिबानला पाकिस्तानची मदत, तर हक्कानी गटाच्या हल्ल्यात पंतप्रधान पदाचा दावेदार मुल्ला बरादार जखमी सुत्रांची माहिती 


9. ओव्हल कसोटीचं भवितव्य भारतीय गोलंदाजांच्या हाती, 368 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात इंग्लंडची बिनबाद 77 अशी सुरुवात


10. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना कोरोनाची लागण, दररोज होणाऱ्या रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह, ओव्हल कसोटीवर मात्र कोणताही परिणाम नाही