Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 08 ऑगस्ट 2021 रविवार | ABP Majha

Continues below advertisement


1. मिल्खासिंग यांचं स्वप्न आज साकार झालं, निरज चोप्राच्या भावना, आपलं सुवर्ण पदक दिवंगत मिल्खासिंग यांना केलं समर्पित 


2. ऑलिम्पिक पदक विजेत्यांना बीसीसीआय सन्मानित करणार, नीरज चोप्राला एक कोटी रुपये तर इतरांनाही भरघोस बक्षीसं जाहीर


3. पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत आज मोठ्या निर्णयाची शक्यता, दुपारी पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठक


4. एमपीएससीने अभियांत्रिकी सेवांसाठी जाहीर केलेली उमेदारांची सुधारित यादी वादाच्या भोवर्‍यात, मुंबई उच्च न्यायालयाने दिली तात्पुरती स्थगिती


5. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटनांकडून घातपाताची शक्यता, गुप्तचर यंत्रणांचा अहवालानंतर दिल्लीत कडक सुरक्षा तैनात


 



6. राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, दिल्लीतील  बलात्कार पीडितेचा फोटो ट्वीट केल्यानं ट्विटरची कारवाई


7. केंद्र सरकारनं लॉन्च केलं 'पीएम दक्ष' पोर्टल आणि अॅप सुरु, रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी मिळणार कौशल्य प्रशिक्षण


8. जगाला कोरोना संकटाच्या गर्तेत लोटणारं चीनमधलं वुहान पुन्हा कोविडच्या कचाट्यात, डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढल्यानं संपूर्ण शहर सील


9. गाणी ऐकताना वायरलेस इयरफोनचा कानात स्फोट झाल्यानं तरुणाचा मृत्यू, जयपूरच्या राकेश नगरमधली धक्कादायक घटना


10.  इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांवर आटोपला, नॉटिंगहॅम कसोटी जिंकण्यासाठी भारताला 157 धावांची गरज