1. मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात निकाल; सकाळी 10.30 वाजता सुनावणीला सुरुवात


 

Continues below advertisement



  1. अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात सीबीआय जवळच्या नातेवाईकांच्या कॉल रेकॉर्डिंगची तपासणी करणार


 



  1. ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा घेणार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ; तर हिंसाचाराविरोधात भाजपचं देशभरात आंदोलन


 



  1. राज्यात काल दिवसभरात 65 हजार 934 रुग्ण कोरोनामुक्त, तर 51 हजार 880 नवीन कोरोना रुग्णांची नोंद


 



  1. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती; महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देशापेक्षा कमी


 



  1. महाराष्ट्रातील पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्करचा दर्जी देऊन लसीकरण करा, बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; आरोग्यमंत्रीही आग्रही भूमिका मांडणार


 



  1. कोरोना बाधितांची वारंवार आरटीपीसीआर चाचणी नको, ICMR च्या सूचना ; प्रयोग शाळांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न


 



  1. औरंगाबादमध्ये 16 मेपासून हेल्मेटसक्ती, चालकासह सहप्रवाशालाही हेल्मेट घालणं सक्तीचं; वाहतूक पोलिसांचं परिपत्रक


 



  1. भारतात लवकरच 5जी सेवा सुरु होणार, भारत सरकारकडून 5जी नेटवर्कच्या चाचण्यांना परवानगी; चायनीज कंपन्यांना बंदी


 



  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉनसन यांच्यात चर्चा, 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार संबंधांचा रोडमॅप तयार