दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो
1. देशभर दिवाळीचा उत्साह, लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळला पन्हाळगड, अयोध्येतही भव्य दीपोत्सवाची तयारी तर खरेदीसाठी बाजार अजूनही फुललेलेच
2. केंद्रानं अबकारी करात कपात केल्यानं पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त, विधानसभेला सामोरं जाणाऱ्या 5 राज्यांसह भाजपशासित 9 राज्यांचीही करात कपात, महाराष्ट्राच्या भूमिकेकडे लक्ष
दिवाळीच्या शुभमुहुर्तावर काल केंद्र सरकारकडून सामान्य लोकांना काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला गेला. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची कपात करण्याचा काल निर्णय घेतला. राज्यांनीही त्यांच्या व्हॅट करात कपात करण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. याला प्रतिसाद देत तात्काळ गोव्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला. आता महाराष्ट्रात वॅट करात कधी कपात होणार? असा सवाल केला जात आहे.
3. केंद्र सरकार बफर स्टॉकमधला 1 लाख टन कांदा बाजारात उतरवणार, कांद्याचे दर प्रतिकिलो 5 ते 12 रुपयांनी कमी होण्याची शक्यता
पेट्रोल-डिझेलबरोबरच आता कांदाही स्वस्त होण्याची शक्यता आहे.. कारण केंद्र सरकार बफर स्टॉकमधला १ लाख टनापेक्षा जास्त कांदा बाजारात उतरवणार आहे. त्यामुळं कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी कांद्याचे दर ५० ते ६० रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचले होते. सध्या कांदा ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दरानं विकला जातोय.. बफर स्टॉकमधला कांदा बाजारात आल्यानं कांदा स्वस्त होणार असल्याचं बोललं जातंय.
4. पुढील आदेशापर्यंत एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना संप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची मनाई, दिवाळीतला संप टळल्यानं प्रवाशांचा जीव भांड्यात
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून संपाची घोषणा केली होती, पण मुंबई उच्च न्यायालयानं पुढील आदेश येईपर्यंत संप करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास टळला आहे. या मुद्यावर हायकोर्टात आज पुन्हा सविस्तर सुनावणी होणार आहे.
5. अनिल देशमुखांवरील खंडणीच्या आरोपांप्रकरणी आणखी पुरावे नाहीत, परमबीर सिंह यांचं चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर, परमबीर यांच्या वकिलाकडून पुष्टी
6. बेस्ट प्रशासनाची महिलांना भाऊबीज भेट, 6 नोव्हेंबरपासून 100 मार्गांवर लेडिज स्पेशल बस धावणार, 90 टक्के बस वातानुकुलीत असणार
7. राज्याच्या वाट्याचा 17 हजार कोटींचा जीएसटी परतावा वितरीत, 30 हजार कोटींची थकबाकी असण्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्राच्या वाट्याला 3 हजार 53 कोटी
8. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला डब्ल्यूएचओची परवानगी, आपत्कालीन वापरासाठी जगभरात वापर करण्याची मुभा
9. राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा, न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यापासून प्रशिक्षकपदाची सूत्रं द्रविडकडे
10. एबीपी माझाच्या जगभरातील प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा, दिवसभर विशेष कार्यक्रमांची मेजवानी