दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहिली ते सातवीच्या शाळा आजपासून सुरु होणार, 20 महिन्यांनी विद्यार्थी शाळेत जाणार, शिक्षक आणि शाळा प्रशासनाची स्वागताची तयारी


2. आजपासून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी निर्बंध पाळावे लागणार, परराज्यातून येणाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लशीचे दोन डोस आणि आरटीपीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक


3. टीव्ही पाहणं आजपासून महागणार, चॅनलदरात 35 ते 50 टक्क्यांची वाढ, जियोच्या प्रीपेड सेवा 21 टक्क्यांनी महाग, 14 वर्षांनी काडीपेटी आता 2 रुपयांत मिळणार


4. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर; घरातूनच बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचं आवाहन


5. हार्बर मार्गावर आजपासून एसी लोकल धावणार, तसेच सीएसएमटी आणि अंधेरी दरम्यान धावणाऱ्या 44 सेवा आजपासून गोरेगावपर्यंत, प्रवाशांना मोठा दिलासा



6. मुंबईत साडेतीन महिन्यांच्या बाळाचं महिलेकडून अपहरण, काळाचौकी परिसरातील धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात, आरोपी महिला आणि बाळाचा शोध सुरु


7. मुंबई दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी आज शरद पवारांची भेट घेणार, जय बांगला, जय मराठाचा नारा देत काल आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची भेट


8. खूप झालं, आता वाट पाहणार नाही, विजय मल्ल्याविरोधातील अवमान याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाची प्रतिक्रिया 18 जानेवारीला फैसला सुनावणार


9. जम्मू काश्मीरमधील पुलवाम्यात सुरक्षादल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरुच, कस्बा यार परिसरात जवानांकडून प्रत्युत्तर सुरु


10. जून तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेची सकारात्मक वाटचाल, जीडीपी 8.4 टक्क्यांवर, आर्थिक वर्षात विकास दर 10 टक्के राहण्याचा अंदाज


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा