2. साताऱ्यात येत्या 3 दिवसात अतिवृष्टीचा इशारा, सांगलीत एनडीआरएफची 2 पथके दाखल, तर खडकवासल्यातून विसर्ग वाढल्याने पुण्यातला भिडे पूल पुन्हा पाण्याखाली
3. पुरामुळे गडचिरोलीतल्या 300 गावांचा संपर्क तुटला, कोल्हापुरातली पुराची स्थिती टाळण्यासाठी अलमट्टीचा विसर्ग वाढवला, मुंबईतही संततधार
4. देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादवांच्या नेतृत्वात भाजपच्या निवडणूक समितीची आज बैठक, मतदारसंघ निहाय अहवालावर होणार चर्चा
5. शरद पवारांना सांगा आमचंच सरकार येणार आहे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं बारामतीत वक्तव्य
6. अवधूत तटकरेंचा आज शिवसेनाप्रवेश, 13 सप्टेंबरला भास्कर जाधव स्वगृही परतण्याची शक्यता, तर नवी मुंबईत राष्ट्रवादीचे 55 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
7. आसामसह पूर्वोत्तर भारतातील राज्यांना विशेष दर्जा देणाऱ्या कलम 371 ला हातही लावणार नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आश्वासन
8. विक्रम लॅण्डर चंद्रावर सुस्थितीत, ऑर्बिटरकडून फोटो मिळाल्याची इस्रो प्रमुख के सिवन यांची माहिती, वैज्ञानिकांसह देशवासियांच्या आशा पल्लवित
9. अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून इंग्लडचा 185 धावांनी धुव्वा, पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत मालिकेवर वर्चस्व
10. स्पेनच्या राफेल नदालला अमेरिकन ओपनचं विजेतेपद, फायनलमध्ये रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा धुव्वा, नदालचं कारर्कीर्दीतलं 19वं ग्रॅडस्लॅम