Majha Sanman 2022 : एबीपी माझाचा 'माझा सन्मान' पुरस्कार 2022 , वाचा पुरस्काराचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स

ABP Majha Sanman 2022 : यंदाच्या माझा सन्मान पुरस्काराचे वितरण सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नऊ जणांचा सन्मान करण्यात येत आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Aug 2022 07:49 PM
Majha Sanman 2022 : माणसाच्या आयुष्यात अनुभव आणि योग्य निर्णयाला महत्व: गौर गोपाळदास महाराज 

आपल्या आयुष्याची प्रत्येक पहाट एक आव्हान घेऊन येते, आपल्या आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ एक धडा देऊन जाते. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात अनुभव आणि योग्य निर्णय या गोष्टींना महत्व असल्याचं गौर गोपाळदास महाराज यांनी म्हटलंय. ते एबीपी माझाच्या माझा सन्मान या पुरस्कारात बोलत होते. 

Majha Sanman 2022 : अभिनेते अशोक सराफ यांना  'माझा सन्मान' पुरस्कार 2022

अभिनेते अशोक सराफ यांना  'माझा सन्मान' पुरस्कार 2022 देण्यात आला. अशोक सराफ यांची तब्येत बरी नसल्याने ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने निवेदिता सराफ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

समाजसेवेसाठी डॉ. राणी बंग यांचा सन्मान

आदिवासी आणि वंचितांसाठी मोठं काम करणाऱ्या डॉ. राणी बंग यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एबीपी माझाचा 'माझा सन्मान' पुरस्कार प्रदान.

तबला हाच श्वास आणि ध्यास! पं. सुरेश तळवलकरांना कृतज्ञता पुरस्कार

पं. सुरेश तळवलकरांना गौर गोपाल दास यांच्या हस्ते एबीपी माझाचा 'माझा सन्मान' पुरस्कार प्रदान.

Majha Sanman 2022 : माझा सन्मान पुरस्कार सोहळ्यास सुरुवात

एबीपी माझाच्या 'माझा सन्मान' पुरस्कार 2022 ला सुरुवात झाली असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गौर गोपालदास महाराज आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. 

पार्श्वभूमी

Majha Sanman 2022 : एबीपी माझाच्या यंदाच्या 'माझा सन्मान' पुरस्कारांचे वितरण झालं असून प्रख्यात अभिनेते अशोक सराफ, जेष्ठ समाजसेविका राणी बंग, अभिनेता रितेश देशमुख, कोविड टास्कचे प्रमुख  डॉ. संजय ओक यांच्यासह नऊ जणांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. एबीपी माझाचा हा सोहळा  3 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गौर गोपालदास महाराज आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.


सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना 'माझा सन्मान' बहाल करण्यात आला. ज्यांनी आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवला, महाराष्ट्रासह देशानंही ज्यांच्या कार्याची दखल घेतली अशा गुणीजनांना 'माझा सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 


एबीपी माझाकडून देण्यात येणारा 'माझा सन्मान' 2022 पुरस्कार सोहळा आज आणि उद्या म्हणजे 14 आणि 15 ऑगस्ट रोजी तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात. एबीपी माझावर संध्याकाळी 6 ते 8 या सोहळ्याचे प्रक्षेपण होणार आहे. 


'माझा सन्मान' पुरस्काराचे मानकरी 



डॉ. संजय ओक, कोविड टास्कचे प्रमुख 
विलास शिंदे, सह्याद्री फार्म्सचे प्रणेते 
विजय रघुवीर, प्रख्यात जादूगार
अमृता सुभाष, ख्यातनाम अभिनेत्री 
आशुतोष कोतवाल, ख्यातनाम शास्त्रज्ञ
रितेश देशमुख, अभिनेता 
पंडित सुरेश तळवलकर, तबला उस्ताद 
डॉ. राणी बंग, सामाजिक कार्यकर्त्या
अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.