- हाऊडी मोदीच्या व्यासपीठावरून पंतप्रधानांचा पाकिस्तानला सूचक इशारा तर मुस्लिम कट्टरपंथियांविरोधात एकत्र लढण्यासाठी ट्रम्प यांची नरेंद्र मोदींना साथ
- मुंबईत पेट्रोलचे दर ऐंशीच्या घरात, सहा दिवसात दोन रुपयांची वाढ, अरामकोमधील ड्रोन हल्ल्याची झळ
- भाजपाध्यक्ष अमित शाह 26 तारखेला पुन्हा मुंबई दौऱ्यावर, भाजपकडून शिवसेनेला 120 जागांची ऑफर येत्या दोन दिवसात फॉर्म्युला ठरण्याची शक्यता
4.ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाला तर चिंता नाही, रिफंड मिळेपर्यंत बँकेकडून दर दिवशी शंभर रुपयांची नुकसान भरपाई, रिझर्व्ह बँकेचं परिपत्रक जारी
- तुळजापुरातील शहाजीराजे महाद्वारावर थ्रीडी रोषणाई, आई भवानी आणि शिवरायांची प्रतिकृती साकारली, तर आजपासून भवानी मातेची मंचकी निद्रा प्रारंभ
- मराठमोळा पैलवान राहुल आवारेला कझाकस्तानमध्ये कांस्यपदक, जागतिक कुस्तीचं पदक मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय पैलवान, पुण्यात जंगी सेलिब्रेशन
- घोषणाबाजी कराल तर तिकीटच देणार नाही, पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यात अजित पवारांचा अतिउत्साही कार्यकर्त्यांना दम
- लोकांनी हात वर करुन मतदान करण्याची पद्धत आणली तरीही लोक भाजपला भरभरून मतदान करतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य
- स्वाभिमानाला धक्का पोहोचला म्हणून छत्रपती शिवराय दिल्ली दरबारातून उठून गेले होते, साताऱ्यात शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
- केजमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता, उमेदवार नमिता मुंदडा यांच्या फेसबुक पोस्टमधून पवार आणि पक्षाचं चिन्हं गायब
व्हिडीओ :