Majha Maharashtra Majha Vision LIVE : कंगनापेक्षा शेतात राबणाऱ्या आमच्या माउलीला प्रसिद्धी द्यायला हवी - गुलाबराव पाटील

ABP Majha Maharashtra Majha Vision LIVE Updates: महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती होत आहे. नव्या महाराष्ट्रसाठी सत्ताधाऱ्यांचं व्हिजन काय आहे? जाणून घेऊया 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'मध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Nov 2020 04:51 PM
"मुख्यमंत्र्यांसह राज्यातील 43 पैकी 38 मंत्र्यांवर कर्ज आहे. तुम्ही स्वत:च्या कुटुंबासाठी कर्ज घेऊ शकता, राज्यातील गोरगरीब जनतेसाठी कर्ज घेताना तत्त्वज्ञान आठवतं, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर केली. तसंच "राज्य सरकारची जबाबदारी शून्य असते हा नवा शोध लागला. ही अजब सरकारची गजब कहाणी आहे," अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या कामगिरीवर भाष्य केलं. सोबतच सरकारला अपमान करुन घ्यायची सवय लागली आहे, असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.
कोण आहे ही कंगना ? कंगनापेक्षा शेतात राबणाऱ्या आमच्या माउलीला प्रसिद्धी द्यायला हवी.. कंगना म्हणजे पिक्चरमध्ये फ़ोटो काढून पैसे कमवणारी बाई, तिला क़ाय एवढा भाव द्यायचा - गुलाबराव पाटील
लॉकडाऊनमुळे सामान्यांचं आर्थिक नुकसान होतं. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय आहे. गरज असेल तेव्हा करावाच लागेल. युरोपातील काही देशात लॉकडाऊन पुन्हा लागलं आहे. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पिक येईल त्यावेळी लॉकडाऊन करणं भाग आहे. पण आपल्याकडे लॉकडाऊनची वेळ येईल असं वाटत नाही. सगळ्यांनी स्वयंशिस्त पाळणं गरजेचं आहे. काही ठिकाणी निर्बंध आणावे लागतील. संख्या वाढली तर या गोष्टींवर निर्बंध आणणं गरजेचं आहे. सरकार काळजी घेत आहे. लॉकडाऊन हे सध्या तरी उत्तर नाही, असं राजेश टोपे म्हणाले.
कोरोनाला पूर्ण हरवायचं आहे, हा आपला उद्देश आहे. कोरोनाची लस कधी येईल याची शाश्वती देऊ शकत नाही. पण लस आली तरी गाफिल राहून चालणार नाही,असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. लॉकडाऊन हे सध्या तरी उत्तर नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय 17 हजार रिक्त जागा भरणार आहोत, असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.
कृषी कायद्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. आम्ही त्यावर चर्चा करुन शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेणार आहेत, असं राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते. सोबतच वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये विसंवाद नसल्याचंही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत अपप्रचार केला जातोय. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारचे प्रयत्न थांबलेले नाहीत. कुणाचाही विरोध आरक्षणाला नाही. मराठा आरक्षणाची ही सगळी प्रक्रिया फडणवीसांच्या काळात झाली. आम्ही ती पुढं नेत आहोत. निष्णात वकिलांची फौज आहे. चार वेळा लेखी अर्ज आपण सर्वोच्च न्यायालयात केले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत रस्त्यावर येण्यात काही अर्थ नाही, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं.
'महाविकास आघाडीचं सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वांना अशक्य वाटणारी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि ताबडतोब त्याची अंबलबजावणीही केली. त्यानंतर आलेल्या चक्रीवादळातही सरकारने मदत जाहीर केलं. कोरोना काळात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे कटुता आली, पण लोकांच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ते निर्णय घेतले.'; असं एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांसंदर्भात बोलताना सांगितलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
"51 हजार कोटींच्या सामंजस्य करारातून नवे एक लाख रोजगार तयार होत आहेत. नवी मुंबईत डेटा सेंटर सुरु होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाचे उद्योग सुरु होत आहेत. रायगडमध्ये औषध कंपन्या सुरु होत आहे. औरंगाबादमध्येही अन्नप्रक्रिया सुरु होत आहे. पुण्यातील हिंजवडी, चाकण, पनवेलमध्येही उद्योग येत आहेत," अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.

वीज बिलमाफीचं क्रेडिट शिवसेनेनं घ्यायचं की राष्ट्रवादीनं, यात नितीन राऊतांचा बळी गेलाय, असं म्हणत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. तसेच आपासातल्या राजकारणात कोणी क्रेडिट घ्यावं, यामध्ये दीड कोटी जनतेची फसवणूक करताय हे चुकीचं आहे. असंही ते बोलताना म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.
वीजबिल माफी हे केवळ एका खात्याचं नाही. हे सरकारचं काम आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एमईआरसीला प्रस्ताव दिला. वाढीव वीज बिल माफी करु अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर केली होती. वीज ग्राहकांना बिल माफीसाठी आजही विचारविनिमय सुरु आहे. वीजबिलमाफी माझं व्यक्तिगत मत नव्हतंच, तो सरकारचा निर्णय होता, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं.

पार्श्वभूमी

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोरोनामुळे आलेली महामारी, निसर्ग चक्रीवादळ, मराठा आरक्षणाला स्थगिती, अनलॉकच्या प्रक्रियेत विविध सुरु करण्यासाठी झालेली आंदोलनं, वाढीव वीज बिल आंदोलन अशा विविध आव्हानांना ठाकरे सरकारला तोंड द्यावं लागलं. उद्या या सरकारची वर्षपूर्ती होत आहे. या निमित्ताने ठाकरे सरकारचा एक वर्षातील कार्याचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भवितव्याविषयीचं सरकार आणि दिग्गज नेतेमंडळींचं व्हिजन जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सरकारमधील मंत्र्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचं महाराष्ट्रासाठी व्हिजन काय हे आज दिवसभरात जाणून घ्यायचं आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर एबीपी माझावर पाहू शकणार आहात.

असा असेल कार्यक्रम

सकाळी 10 वाजता - नितीन राऊत वि. चंद्रशेखर बावनकुळे

सकाळी 10.30 वाजता - सुभाष देसाई

सकाळी 11 वाजता - अशोक चव्हाण

सकाळी 11.30 वाजता - एकनाथ शिंदे

दुपारी 12 वाजता - बाळासाहेब थोरात

दुपारी 12.30 वाजता - चंद्रकांत पाटील

दुपारी 1 वाजता - जयंत पाटील

दुपारी 1.30 वाजता - राजेश टोपे

दुपारी 2 वाजता - नारायण राणे

दुपारी 2.30 वाजता - वर्षा गायकवाड

दुपारी 3 वाजता - देवेंद्र फडणवीस

दुपारी 4 वाजता - हसन मुश्रीफ

दुपारी 4.30 वाजता -

दुपारी 5 वाजता - आदित्य ठाकरे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.