हुंड्यामुळं वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा होऊ नये म्हणून शीतल वायाळ या लातूर जिल्ह्यातील तरूणीने आत्महत्या केली. मात्र शीतलवर जी वेळ ओढावली ती वेळ कोणत्याही तरूणीवर ओढवू नये, यासाठी एबीपी माझाने औरंगाबादेत हुंडाविरोधी परिषदेचं आयोजन केलं होतं.
एबीपी माझाच्या या परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार मांडले. शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा आणि अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर इत्यादी मान्यवर या परिषदेसाठी उपस्थित होते.
हुंड्यामुळे मुलीच्या बापाला लग्नानंतर कोणत्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं, त्या समस्या मान्यवरांनी या परिषदेत मांडल्या. मुलीचं लग्न झाल्यानंतर लग्नासाठी घेतलेलं कर्ज कित्येक वर्षे फिटत नाही, त्यासाठी शेतीही विकावी लागते. अशा विविध समस्या मराठवाड्यातल्या नागरिकांनी एबीपी माझाच्या हुंडाविरोधी परिषदेत मांडल्या.
संबंधित बातम्या