#हुंडाबंदी: औरंगाबादेत 'माझा'ची हुंडाविरोधी परिषद
एबीपी माझा वेब टीम | 22 Apr 2017 09:43 AM (IST)
औरंगाबाद: एबीपी माझाने हुंडा प्रथेविरोधात औरंगाबादमध्ये हुंडाविरोधी परिषदेचं आयोजन केलं आहे. मुलीच्या लग्नात हुंडा द्यायला पैसे नाहीत, म्हणून गेल्या काही दिवसात मराठवाड्यात आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. एवढंच नाही, तर वडिलांच्या डोक्यावरचं ओझं कमी व्हावं, म्हणून लातूरच्या शितल वायाळ या तरुणीनं आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. त्यामुळे हुंड्याच्या या क्रूरप्रथेला मूठमाथी मिळावी म्हणून 'एबीपी माझा'नं एक पाऊल पुढं टाकलं आहे.