देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये चार नेत्यांच्या हत्येचा कट, संशयित प्रसारमाध्यमांसमोर हजर, शेतकरी नेत्यांचा खबळजनक दावा

2. कोविन अॅपमधील अडथळे दूर होताच मुंबईत 92 टक्के लसीकरण, तर सर्वात जलद दहा लाख डोस देण्यात भारत जगात अव्वल

3. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95वी जयंती, पुतळा अनावरणासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार

4. अण्णा हजारे यांची समजूत काढण्यात भाजप नेत्यांना अपयश, 30 जानेवारीपासून उपोषण करण्यावर अण्णा हजारे ठाम

5. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीचे छापे, तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर पुतणे मेहुल ठाकूर आणि कंपनीच्या सीएला अटक

6. सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत एक हजार कोटीपेक्षा अधिक नुकसान, तर कोविशील्ड लस पूर्णत: सुरक्षित, अदर पुनावाला यांची माहिती

7. बर्ड फ्लूने माणसाचा मृत्यू झाला असेल तर शोधून द्या, रोख बक्षिस देईन, मंत्री सुनील केदार यांचं आव्हान; चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनावर मात करण्यास शक्ती मिळत असल्याचाही दावा

8. झाडाचे पान का पडले, म्हणूनही भाजप महाविकास आघाडीविरोधात आंदोलन करु शकते, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला जयंत पाटलांचा टोला

9. 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा हद्दपार होण्याची शक्यता, नोटा परत घेण्यासाठी मोहीम आखा, आरबीआयचे बँकांना आदेश

10. गावकऱ्यांनी पेटवलेला टायर हत्तीच्या कानात अडकला, तामिळनाडूच्या मसिना गुडी गावातील घटना, उपचारादरम्यान हत्तीचा मृत्यू