देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये..

  1. राज्याच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट; ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फक्त 2 ते 3 दिवसांचं अधिवेशन घेण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन

  2. कोरोनाच्या रेमेडिसिवीर लसीचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दहापट किमतीने विक्री होत असल्याचं उघड; पाच जण ताब्यात, मुंबईत एफडीएची कारवाई

  3. महाराष्ट्रात काल दिवसभरात 8 हजार 348 नवे कोरोनाग्रस्त, तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या पार

  4. पुण्यात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा, भाजीपाला खरेदीसाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंतची वेळ; तर औरंगाबाद आजपासून सुरु होणार

  5. ठाण्यात हॉटस्पॉट विभागांमध्येच 21 जुलैपर्यंत लॉकडाऊन; इतर ठिकाणी व्यवहार सुरु होणार, ठाणे पालिका आयुक्तांचे आदेश

  6. अवाजवी देयके करणाऱ्या पंधरा रुग्णालयांना ठाणे पालिका आयुक्त बजावणार नोटीस, 27 लाखांची देयके आढळली अवाजवी

  7. नागपुरातील ऑडिओ क्लिप प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी; गंभीर विषयांचं गृहमंत्र्यांकडून राजकारण होत असल्याचा विरोधी पक्ष नेते देवेंद्रफडणवीसांचा आरोप

  8. कोरोनावरील लसीच्या संशोधनाला सकारात्मक यश; लसीच्या क्लिनीकल ट्रायल पूर्ण, आता मानवी चाचणी सुरू, केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे यांची माहिती

  9. इराणमध्ये तब्बल अडीच कोटी लोकांना कोरोनाची लागण, राष्ट्रपती हसन रुहानी यांचा अंदाज; ऑफिशियल आकडेवारीनुसार इराणमध्ये 2 लाख 71 हजार कोरोनाबाधित

  10. अयोध्येतल्या राम मंदिराच्या निर्मितीच्या कामाचं तीन किंवा पाच ऑगस्टला भूमिपूजन होण्याची शक्यता; तारखांचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाला सादर