ABP Ideas Of India : 'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. देशभरात उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट  करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजपने केली आहे मात्र सध्या हा चित्रपट राज्यात करमुक्त केला जाणार नसल्याची माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे  यांनी दिली आहे. 'द काश्मीर फाईल्स' करमुक्त करण्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे   ABP नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) समिटमध्ये ते बोलत होते.  हे दिग्गज भारताच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलणार असून, देशाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल त्यांचे विचार शेअर करणार आहेत


'द कश्मीर फाइल्स' करमुक्त करण्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, असे चित्रपट करमुक्त करण्याची गरज नाही, कारण लोक स्वतः पैसे खर्च करून हा चित्रपट पाहणार आहेत. कोणताही चित्रपट बनवण्याचा अधिकार निर्मात्यांना आहे आणि ते तो वापरत आहेत, असे आमचे मत आहे. लोक त्यांच्या  प्रतिक्रिया देत आहेत पण सरकारला प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची सक्ती नाही.


लग्न कधी करणार? आदित्य ठाकरे म्हणाले....


 तरुणांचे नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्याबद्दल तरुणाईलाही अनेक प्रश्न आहेत. लग्न कधी करणार? या प्रश्नाला  आदित्य ठाकरे यांनी शिथाफीने बगल दिली आहे. या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले,  हा प्रश्न माझ्या घरी देखील चर्चेत असतो आणि आत्ता हा कार्यक्रम जर आई-वडील बघत नसेल तर बरं आहे. 


 सध्या देश स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करत आहे. स्वातंत्र्याची 75 गौरवशाली वर्षानिमित्त ABP नेटवर्क विविध क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणत आहे. ABP नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) समिटमध्ये संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रापासून तंत्रज्ञान, व्यवसाय आणि राजकारण अशा विविध क्षेत्रातील विचारप्रवर्तक लोक आणि उत्कृष्ट विचारसरणी या मंचावर पाहायला मिळाली.