Anil Parab On ST Strike: एसटी संपाबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत निवेदन जाहीर केलंय. दरम्यान, "संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. 31 तारखे पर्यंत सर्व कामगारांनी कामावर यावे", असं आवाहन अनिल परब यांनी केलंय. "एसटी कामगारांच्या आर्थिक बाबींबाबत शासन निर्णय घेईल.कामगारांना आर्थिक वाढ दिलीच आहे. इतर मागण्यांवर चर्चा करत मान्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. सातवा वेतन अयोगाप्रमाणे तफावत देण्याचे मी मान्य केले नाही. इतर मागण्यांबाबत चर्चेची तयारी आहे", असंही त्यांनी म्हटलं आहे. 


राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेल्यापासून राज्यातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागत आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याची वारंवार आवाहन केले जात आहे. परंतु, अद्यापही राज्याच्या काही भागातील एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमुळं सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत.


विधान परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलताना अनिल परब म्हणाले की, संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. तसेच कामगारांनी येत्या 31 मार्चपर्यंत कामागर रुजू व्हावे, असं आवाहन अनिल परबांनी केलंय. याचबरोबर आत्महत्या करणाऱ्या कुटुंबांना सहानुभूती देत कुटुंबातील व्यक्तीला कामावर घेतलंय. कामगारांवरच्या सगळ्या कारवाया आम्ही आता ही मागे घेत आहोत.एसटीचा किमान पगार 25 हजार तर, कमाल पगार 60 हजारांपर्यंत आहे. भाजी विकण्याचं कारण काय? एसटीत येऊन काम करा. इतर मागण्यांवर चर्चा करत मान्य करण्यासाठी तयार आहोत. परंतु, सातवा वेतन अयोगाप्रमाणे तफावत देण्याचे मी मान्य केले नाही,असंही अनिल परबांनी विधान परिषदेत म्हटलं आहे. 




दहावी व बारावीच्या सध्या परीक्षा सुरू आहेत. ज्या भागात शाळा आहेत, त्या मार्गावर गाड्या सोडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार इतर मार्गांवरील गाड्या संबंधित मार्गांवर वळवण्यात येतील, असं परब यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.




हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha