LIVE BLOG | आज दिवसभरात... 13 फेब्रुवारी 2019
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2019 07:39 AM (IST)
1. बुलडाण्यात एक कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त, एक जण पोलिसांच्या ताब्यात, फरार आरोपींचा शोध सुरु 2. विरारमध्ये बारचालकाला मनसे पदाधिकाऱ्याचा चोप, कॅन्सर पीडित रुग्णाची फसवणूक केल्याचा आरोप 3. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारकडून दोन हजार कोटींचा निधी मंजूर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, पशुस्वास्थ्य योजनेलाही मंजुरी 4. प्रियांका गांधींच्या खांद्यावर यूपीतल्या 42 जागांची धुरा, मोदींच्या वाराणसी, योगींच्या गोरखपूर, वरुण गांधींच्या सुलतानपूर मतदारसंघांत काँग्रेसचा प्रचार करणार 5. हवाई दलाचं मिग-27 राजस्थानच्या जयपूरमध्ये कोसळलं, वैमानिक सुरक्षित, दुर्घटनेची चौकशी होणार