LIVE: 'भारत माता की जय' म्हणावंच लागेल- मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 02 Apr 2016 02:10 AM (IST)
#नाशिक : देशात राहायचं असेल तर 'भारत माता की जय' म्हणावंच लागेल - मुख्यमंत्री ---------------------------- औरंगाबाद : HSC बोर्डाचे अध्यक्ष सुखदेव डेरे याचं निलंबन.. सुखदेव डेरे यांच्याविरोधात अनेक तक्रारी.. उपसंचालक असताना त्यांनी दिलेल्या अनेक मान्यता संशयास्पद --------------------- कोलकाता पूल दुर्घटना: पुलाखाली आणखी तीन जणांचे मृतदेह सापडले, मृतांचा आकडा 27 वर ---------------------- मुंबई : प्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहुल राजला पोलिसांनी घेतलं ताब्यात ---------------------- राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचं शनिशिंगणापूरला जाणं रद्द, अहमदनगरमधूनच परत जाणार ---------------------- शनि शिंगणापूर : शनि मंदिर देवस्थान समिती मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार ---------------------- पुणे : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई शनी शिंगणापूरकडे रवाना... उच्शच न्यायालयाच्या निर्णयनंतर चौथऱ्यावर प्रवेश करण्यासाठी भूमाता ब्रिगेड आग्रही, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचाही तृप्ती देसाई यांना पाठिंबा -------------------------- मुंबई: प्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहची पोलिसांकडून चौकशी सुरु -------------------------------- पुणे: बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिराजवळील दुकानामध्ये आग, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी -------------------------------- औरंगाबाद: सर्व स्विमिंग पुल आज पासून बंद, महापालिकेची स्विमिंग पुलाना नोटीस -------------------------------- हेडलाईन्स: १. बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या, लग्नाच्या काही महिने आधी जीवन संपवलं, आत्महत्येचं कारण अस्पष्ट -------------------------------- २. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर तृप्ती देसाई आणि चित्रा वाघ शनी मंदिरात जाऊन दर्शन घेणार. तर निकालाची प्रत हाती न लागल्याची शनी प्रशासनाची माहिती -------------------------------- 3. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आयपीएल महाराष्ट्राबाहेर खेळवा, मुंबई भाजपची बीसीसीआयकडे मागणी -------------------------------- 4. स्वतंत्र विदर्भ आणि श्रीहरी अणेंच्या नियुक्ती प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं तिरकस उत्तर, वकील नेमण्याचा अधिकार असल्याने अणेंना नेमल्याचं मुख्यमंत्र्यांचं उत्तर -------------------------------- ५. महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, लासलगावचा कांदा, वेंगुर्ल्याच्या काजूसह 7 पिकांना जीआय मानांकन, शेतकऱ्यांच्या मेहनतीला यश -------------------------------- ६. लातूरच्या पाणीपुरवठ्यासाठी दोन मालवाहू गाड्या तयार, 8 एप्रिलला पहिली फेरी, सोलापूर जिल्ह्यातून पाणी पुरवठ्याची शक्यता -------------------------------- ७. मुंबईसाठी एसी लोकल चेन्नईतून रवाना, एसी लोकल लवकरच मुंबईत दाखल होणार