Aaditya Thackeray : युवा सेनाप्रमुख आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, सचिन अहिर यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. दादरच्या हनुमान मंदिराला रेल्वेने नोटीस दिली होती. या मुद्यावरुन चांगलच राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. याच मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका देखील केली होती. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आज दर्शनासाठी आले होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली होती.
दादर रेल्वे स्टेशनजवळच्या हनुमान मंदिराला रेल्वेने नोटीस दिली होती. शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावरुन महायुती सरकारवर टीका केली. भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभं करत भाजपला आरोपीच्या उभा करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी आज त्या मंदिरात जाऊन आरती केली यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते.
किरीट सोमय्यांना पाहताच ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक
दादरच्या हनुमान मंदिराला रेल्वेने नोटीस दिली होती. त्यावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते. आदित्य ठाकरे यांनी आज मंदिरात येऊन महाआरती केली. पण त्याच्या आधीच भाजप नेते किरीट सोमय्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. किरीट सोमय्यांना पाहताच ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी भाजप आणि सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला.
रेल्वेने दिली स्थगिती दिली
या सर्व घडामोडी पाहता भाजप काय करणार याकडे सर्वांच लक्ष होतं. भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा हनुमान मंदिरात पोहोचले आणि रेल्वेने नोटिशीला स्थगिती दिल्याची घोषणा केली. मंदिरात नित्य पूजा, आरती सुरुच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेल्या पाठपुराव्याचा आर्वजून उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर मात्र आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली. हनुमान मंदिराला घाईघाईने स्थगिती दिली. काल उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व एक्स्पोज केलं आणि आज रेल्वेने स्थगिती दिली अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या: