कोल्हापूर : संविधानानुसार आणि नियमानुसार शिंदे गटाचे 16 आमदार (MLA Disqualification Case)  झालेच पाहिजेत आणि जर शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाले नाही तर ते भाजपाचे (BJP)  वेगळे संविधान असेल ज्यानुसार आजचा निकाल दिला जाईल, अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray)  केली आहे. अध्यक्षांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखावी, असा सल्ला देखील आदित्य ठाकरेंनी दिला आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना दिली आहे. 


आदित्य ठाकरे म्हणाले,  'शिंदे आणि नार्वेकर यांची भेट योग्य नाही ती भेट म्हणजे न्यायमूर्ती आणि आरोपीनं भेटण्यासारखं आहे, हे जगजाहीर आहे. आजचा निर्णय घटनेनुसार असेल अशी आशा आहे. देशाच्या संविधानाप्रमाणे 40 गद्दार हे बाद झाले पाहिजे. पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल महत्तवाचा आहे, डॉ. बाबाासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले आहे त्या संविधनाप्रमाणे गेले तर हे आमदार बाद झाले पाहिजे. जर निकाल वेगळा आला तर ते भाजपाचे वेगळे संविधान  आहे असे वाटेल. 


मुख्यमंत्र्यांच्या गद्दारीची दखल 33 देशांनी घेतली : आदित्य ठाकरे


राज्यात जे सत्तेत बसले आहेत त्या तीन लोकांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण हे आधी तपासले पाहिजे. दोन वर्ष गद्दारीची आहे . हे सरकार गद्दारांचं आहे खोके सरकार आहे. मुख्यमंत्र्यांना वाटते 33 देशांनी त्यांची दखल घेतली परंतु 33 देशांनी त्यांती नाही तर गद्दाराची दखल घेतली आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. महाविकास आघाडीतील काम तयार असून अजूनपर्यंत उद्घाटन नाही . फक्त महाराष्ट्रावरच अन्याय करत आलेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 


विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री शिंदेच्या घरी दिवसाढवळ्या भेटणे अयोग्य : आदित्य ठाकरे


 अध्यक्षांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखावी. पदाची बदनामी न करता संविधान पाळावं, असा सल्ला आदित्य ठाकरेंनी राहुल नार्वेकरांना दिला आहे. दिवसेंदिवस लोकशाही मारली जात आहे. सत्तेच्या विरोधात जे कोणी बोलेल त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पदाजी जबाबदारी राखणे गरजेचं होते. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री शिंदेच्या घरी भेटणे अयोग्य आहे, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.


हे ही वाचा :


आमदार अपात्रतेचा निकाल ही तर मॅच फिक्सिंग, पंतप्रधान मोदींना निर्णय माहित म्हणूनच महाराष्ट्र दौरा; संजय राऊतांचा गंभीर आरोप