Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : आदित्य ठाकरे रामलल्लाच्या दर्शनासाठी

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live :

स्नेहा कदम, एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jun 2022 05:14 PM
Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : आदित्य ठाकरे रामलल्लाच्या दर्शनासाठी

हनुमान गढीचे दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे आता रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले आहेत. रामलल्लाच्या दर्शनानंतर आदित्य ठाकरे हे शरयू नदीकाठी आरती करणार आहेत. 

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यासाठी कोणाच्या अटी-शर्ती नाही : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यासाठी कोणाच्या अटी-शर्ती नाही. अयोध्येत आमचं साधूमहंतांकडून स्वागत : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : जनतेला दिलेली वचनं पाळणं हे शिवसेनेचं हिंदुत्त्व : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : जनतेला दिलेली वचनं पाळणं हे शिवसेनेचं हिंदुत्त्व, मुंबईत रामाच्या आशीर्वादाने रामराज्य येईल : आदित्य ठाकरे

AadityaThackeray Ayodhya Visit Live : अयोध्येत महाराष्ट्र सदनाच्या जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योगींसोबत पत्रव्यवहार करणार : आदित्य ठाकरे

AadityaThackeray Ayodhya Visit Live : अयोध्येत महाराष्ट्र सदनसाठी जागा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पत्र व्यवहार करणार : आदित्य ठाकरे

AadityaThackeray Ayodhya Visit Live : अयोध्येत उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण : आदित्य ठाकरे

AadityaThackeray Ayodhya Visit Live : अयोध्येत उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण, माध्यमांनी हे चित्रही सगळ्यांना दाखवावं : आदित्य ठाकरे 

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत, निलम गोऱ्हे, अनिल देसाई देखील उपस्थित आहेत.

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : आदित्य ठाकरे इस्कॉन मंदिरात दाखल; प्रभू श्रीकृष्णाचे घेतले दर्शन

 पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली आहे. या ठिकाणी त्यांनी प्रभू श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. त्याशिवाय इस्कॉन मंदिरातील प्रमुखांशीदेखील त्यांनी चर्चा केली. 

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल, थोड्याच वेळात इस्कॅान मंदिरात जाणार

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल झाले आहेत. सध्या ते त्रिमूर्ती हॉटेलमध्ये थांबले आहेत. थोड्याच वेळात इस्कॅान मंदिरात जाणार आहेत. शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. आम्ही इथे दर्शनासाठी आलो आहोत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी अयोध्येत पोहोचल्यावर दिली

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : शिवसेना 40 वर्षांपासून अयोध्येत येते, इथे आलं की कामासाठी चांगली ऊर्जा मिळते : संजय राऊत

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : प्रयोजनाशिवायही अयोध्येत येत असतो. इथे आलं की कामासाठी चांगली ऊर्जा मिळते. गेल्या चाळीस वर्षांपासून शिवसेना इथे येत आहे. अयोध्येत राम मंदिराचं राजकारण कायमचं संपलं पाहिजे. किती काळ करणार? इथे शिवलिंग, तिथे शिवलिंग. काहींनी लोकसभा 2024 ची तयारी चालू केल्याचं दिसत आहे. एवढंच प्रेम असेल तर कैलास मानसरोवर प्रत्यक्ष स्थान आहे शिवलिंगाचं ते आधी‌ चीनमधून भारतात आणा. अयोध्येतील राम मंदिराचं काम कसं सुरु आहे या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, "ठरलेल्या वेळेत राम मंदिर पूर्ण होईल." ज्या दिवशी आम्हाला यूपीत लोकनेता मिळेल. त्यादिवशी संघटनेचे हेतू स्पष्ट होतील. अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरु आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : देशात सध्या रावणराज सुरु : अरविंद सावंत

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : जय श्रीराम असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हनुमान हा श्रीरामाचा भक्त आहे हे विसरु नका. ज्यांनी आयुष्यात हनुमान चालीसाचं पुस्तक बघितलं नसेल ते हनुमान चालीसा घेऊन फिरतात हे दुर्दैव आहे. देव-देवतांचे बाजारीकरण होत आहे. अयोध्येतून जाताना राज्याची संकल्पना राबवण्याची ताकद दे ही मागणी घेऊन जाणार आहे. देशात सध्या रावणराज्य सुरु आहे. एवढं चांगलं काम करत असाल तर ईडी दाखवून घाबरण्याची गरज काय? पक्ष बदनाम करत असताना महाराष्ट्र बदनाम करत आहात हे लक्षात ठेवा, असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत सावंत म्हणाले की, "सरकार सकारात्मक असेल तर देर आये दुरुस्त आए. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या भेटीत हा विषय काढला होता. सुभाष देसाई यांनी गेल्या दोन महिन्यात जो पाठपुरावा केला त्याला तोड नाही."

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : अयोध्या दौरा राजकीय नाही, हा श्रद्धेचा विषय : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : "अयोध्या दौरा राजकीय नाही, हा श्रद्धेचा विषय आहे. रामललाचं दर्शन घेण्यासाठी आलोय. देवळात गेल्यावर मागणं मागण्यापेक्षा आशीर्वाद घेत असतो. ऋण व्यक्त करत असतो. जे काही दिलं आहे, सेवा करण्याची संधी दिली आहे त्यासाठी धन्यवाद बोलत असतो. ही रामराज्याची भूमी राजकारणाची नव्हे," अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी लखनौमध्ये दाखल झाल्यावर दिली. यानंतर आदित्य ठाकरे अयोध्येसाठी रवाना झाले.

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : आदित्य ठाकरे लखनौ विमातळावर दाखल, थोड्याच वेळात अयोध्येला रवाना होणार

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : आदित्य ठाकरे लखनौ विमातळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. आदित्य ठाकरे थोड्याच वेळात अयोध्येला रवाना होणार आहेत.

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : आदित्य ठाकरेंच्या हस्ते महाआरती, तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे बडे नेते शरयू नदी किनारी

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज शरयू काठी महाआरती होणार आहे. या महाआरतीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे बडे नेते शरयू नदी किनारी पोहोचले. शिवसेने नेत्या निलम गोऱ्हे, अनिल देसाई आणि चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकाऱ्या इथली पाहणी केली.

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज संध्याकाळी शरयू नदीच्या घाटावर महाआरती, शरयूतीरी जय्यत तयारी

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शरयूकाठीही जय्यत तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. संध्याकाळी 6.45 वाजता शरयू नदीच्या घाटावर महाआरती होणार आहे.  

आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी लखनौ विमानतळाबाहेर जय्यत तयारी

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : आदित्य ठाकरे थोड्याच वेळात लखनौमध्ये पोहोचणार आहेत. आदित्य यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. लखनौ विमानतळाबाहेर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत तर बँड-बाजाही सज्ज आहे. 

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : महाराष्ट्रातील शिवसैनिकांसह उत्तर प्रदेशातील शिवसैनिक आदित्य ठाकरेंचं स्वागत करणार

Aaditya Thackeray Ayodhya Visit Live : राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यामध्ये त्यांचे स्वागत फक्त महाराष्ट्रातील शिवसैनिक नाही तर उत्तर प्रदेश मधील शिवसैनिक सुद्धा करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आम्ही शिवसेनेसोबत आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांचा हा वारसा आदित्य ठाकरे सक्षमपणे पुढे नेतील हा विश्वास आमच्यामध्ये आहे. म्हणूनच आम्ही आदित्य ठाकरे यांचं स्वागताची तयारी केली आहे, अशी प्रतिक्रिया यूपीती शिवसेनेचे प्रवक्ते आणि शिवसैनिकांनी दिली.

पार्श्वभूमी

Aaditya Thackeray Visit Ayodhya : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आदित्य ठाकरे हे लखनऊ विमानतळावर दाखल होतील. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. 


आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यातूनही हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. नाशिकहून ट्रेनने निघालेले हजारो शिवसैनिक तब्बल ३५ तासांनंतर आज पहाटे अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्या स्थानकात पोहोचताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह काही शिवसेना नेते आणि पदाधिकारी अयोध्येत दाखल झाले आहेत. स्थानिक शिवसेना नेत्यांसोबत त्यांच्याकडून आदित्य यांच्या दौऱ्याची तयारी केली जात आहे. मंगळवार रात्री काही शिवसेना नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून या दौऱ्याच्य तयारीच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली आहे. अयोध्येत आदित्य यांच्या दौऱ्याची होर्डिंग्स लावण्यात आली आहेत. 


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन सुरू आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्याचा इन्कार केला आहे. हा दौरा राजकीय नसून श्रद्धेचा असल्याचे त्यांनी याआधी म्हटले होते. 


असा असणार आदित्य यांचा दौरा


- सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरेंचं लखनऊ विमानतळावर आगमन 
- दुपारी 1.30 वाजता- अयोध्येत आगमन. इस्कॉन मंदिराला भेट
- दुपारी 2.30 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान हॉटेल पंचशील येथे पत्रकार परिषद
- दुपारी 4.30 वाजता- हनुमान गढी येथे दर्शन घेणार 
- संध्याकाळी 5 वाजता- प्रभू श्री रामाचं दर्शन
- संध्याकाळी 6 वाजता- लक्ष्मण किल्ला येथे भेट देणार 
- संध्याकाळी 6.45 वाजता- शरयू नदीच्या घाटावर आरती 
- संध्याकाळी 7.30 वाजता- लखनऊला प्रस्थान
 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.