मुंबई : असंवैधानिक मुख्यमंत्री दावोसला जवळजवळ 50 लोकांना घेऊन जाणार आहेत यामध्ये अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे. कुटुंबातील व्यक्ती समजू शकतो,परंतु त्यांच्यापैकी काही जणांसाठी त्यांच्या मुलांनाही सुट्टी असल्याप्रमाणे सोबत नेले जातायत, असं म्हणत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे.
जानेवारी 15 ते 19 दरम्यान दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि 10 सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. त्यावरुन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. दरम्यान या दावोसला होणाऱ्या बैठकीविषयी माहिती देताना अधिकाऱ्यांनी म्हटलं की, मागील बैठकीत स्वाक्षरी केलेल्या 1.37 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांपैकी 76% अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत. तसेच यंदाच्या वर्षात होणाऱ्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, स्मृती इराणी आणि हरदीप सिंग पुरी हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलं?
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारमधील काही मंत्री डावोसला जाणार अशी माहिती मिळाली आहे.असंवैधानिक मुख्यमंत्री दावोसला जवळजवळ 50 लोकांना घेऊन जाणार आहेत यामध्ये अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे. कुटुंबातील व्यक्ती समजू शकतो,परंतु त्यांच्यापैकी काही जणांसाठी त्यांच्या मुलांनाही सुट्टी असल्याप्रमाणे सोबत नेले जात आहे, ही संख्या जवळपास ७० लोकांपर्यंत पोहोचली आहे. अशी माहिती आहे की केवळ 10 जणांनी शिष्टमंडळ म्हणून MEA ची आवश्यक राजकीय मंजुरी मागितली आहे, बाकीच्यांना MEA च्या मंजुरीसाठी अर्ज न करता वैयक्तिक सहलीसाठी सोबत नेले जात आहे.75 लोकांसाठीच्या या सुट्टीमध्ये सध्याचे खासदार, माजी खासदार, खासगी एजन्सींचे काही प्रचारक, सीएम आणि डीसीएमला पीएची संपूर्णटीम, मुख्यमंत्री यांचे ओएसडी यांचा समावेश आहे. येथे 50 लोक काय करतील? तिथं फक्त सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री स्वाक्षरी करतील, सामंजस्य करारावर फक्त सरकारचे प्रमुख आणि संबंधित अधिकारी आवश्यक आहेत. इतके मोठे राष्ट्रीय शिष्टमंडळ कशाला?
हेही वाचा :