आपल्यापैकी अनेक पालकांना वाटतं की लहान मुलाचं आधार कार्ड बनवणं म्हणजे मोठं संकट आहे. लांबच लांब रांगा, मुलांचे फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांचे स्कॅनिंग... या विचारानेच आपण कंटाळतो. पण थांबा! ५ वर्षांखालील मुलांसाठी आधार बनवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने अतिशय सोपी केली आहे. आजच्या व्हिडिओत आपण हेच जाणून घेणार आहोत."
लक्षात घ्या, 5 वर्षांखालील मुलांच्या आधारला 'बाल आधार' म्हणतात. हे कार्ड पालकांच्या आधार नंबरशी लिंक असतं. त्यामुळेच या वयात मुलांचे फिंगरप्रिंट्स किंवा डोळ्यांचे स्कॅनिंग घेतले जात नाही. फक्त मुलाचा फोटो पुरेसा असतो.
आवश्यक कागदपत्रे
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न- कागदपत्रं काय लागतील? फक्त २ गोष्टी महत्त्वाच्या आहेत:
१. पालकांचे आधार कार्ड: आई किंवा वडील कोणाचेही एक आधार कार्ड चालेल.२. मुलाचा जन्माचा दाखला (Birth Certificate): १ ऑक्टोबर २०२३ नंतर जन्मलेल्या मुलांसाठी बर्थ सर्टिफिकेट अनिवार्य आहे.
तुम्ही तुमच्या जवळच्या 'आधार सेवा केंद्रात' जाऊ शकता.
तिथे ऑपरेटर मुलाची माहिती भरतो.
मुलाचा एक फोटो काढला जातो.
आणि ते पालकांच्या आधारशी लिंक केले जाते.
आनंदाची बातमी म्हणजे: ही संपूर्ण प्रक्रिया बिल्कुल मोफत (Free) आहे! यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही.
५ वर्षांनंतर काय?
एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं मूल ५ वर्षांचं होतं, तेव्हा त्याचे बायोमेट्रिक्स (बोटांचे ठसे आणि डोळे) अपडेट करणं अनिवार्य आहे. आधार नंबर तोच राहतो, फक्त माहिती अपडेट होते. हे अपडेट देखील मोफत असते. त्यानंतर वयाच्या १५ व्या वर्षी पुन्हा एकदा अपडेट करावं लागतं.
तर मग, उशीर कशाला? जर तुमच्या बाळाचं आधार कार्ड अजून बनवलं नसेल, तर आजच जवळच्या केंद्रावर जा. हा व्हिडिओ आपल्या इतर पालक मित्रांसोबत नक्की शेअर करा