Ratnagiri ZP Election Result 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाला आहे. (Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026) एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं होतं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे.

Continues below advertisement

रत्नागिरी जिल्हा परिषदेत एकूण 56 जागांपैकी 40 जागांवर शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली. तर शिवसेना ठाकरे गटाने 6, राष्ट्रवादी अजित पवार गट 5, भाजप 4, मनसेने 1 जागेवर विजय मिळवला. तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खातंही उघडता आले नाही. (Ratnagiri ZP Election Result 2026)

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 55.79 टक्के मतदान झाले होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे 56 गट असून, सर्वसाधारणसाठी 38 गट असून, त्यातील महिलांसाठी 18 गट आरक्षित होते. ओबीसीसाठी 15 गट असून, त्यातील महिलांसाठी 8, तर अनुसूचित जातीसाठी 2 असून, यातील महिलेसाठी 1 गट आणि अनुसूचित जमातीसाठी एक गट आरक्षित करण्यात आले होते. दक्षिण रत्नागिरीतील संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तसेच उत्तर रत्नागिरीतील मंडणगड या पाच तालुक्यांतील जिल्हा परिषदेचा एकही गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झालेला नाही. मात्र, खेड तालुक्यातील लोटे, भरणे, विराचीवाडी, चिपळुणातील शिरगाव, अलोरे, दापोलीमधील दाभोळ, पालगड आणि गुहागरातील कोंडकारूळ हे गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित करण्यात आले होते.

Continues below advertisement

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निकालाची अंतिम आकडेवारी- (Ratnagiri ZP Election Result 2026)

एकूण जागा : 56 

भाजप- 04

शिंदे शिवसेना - 40

राष्ट्रवादी अजित पवार गट- 5

शिवसेना ठाकरे गट - 6

मनसे -1

काँग्रेस - 0

राष्ट्रवादी शरद पवार गट -0

अपक्ष  - 0

संबंधित बातमी:

Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल