बीडमध्ये उन्हात पाणी भरल्याने 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 20 Apr 2016 05:43 AM (IST)
बीड : बीडमध्ये दिवसभर उन्हात पाणी भरल्यामुळे उष्माघाताने अकरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. आष्टी तालुक्यातील साबलखेडा गावात ही घटना घडली आहे. योगिता देसाई असं या मुलीचं नाव असून ती पाचवीत शिकत होती. शाळेला सुट्टी असल्याने योगिताने भर उन्हात घराजवळ असलेल्या हातपंपावरुन पाणी भरलं. मात्र सायंकाळी उलट्या आणि जुलाब होऊ लागल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने योगिताचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. दरम्यान, मराठवाड्यात पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. पाणीटंचाईसोबतच या वाढत्या तापमानाचा फटकाही बसताना पाहायला मिळत आहे.