सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये चक्क पाण्यावर तरंगणारा अनोखा दगड सापडला आहे. शिवमुद्रा संग्राहलय मालवणचे संचालक उदय रोगे यांना हा दगड सापडला.
लोकांना पाहण्यासाठी रोगे यांनी हा दगड आपल्या संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवला आहे.
सुमारे 2 किलो वजन आणि 1 फूट लांबीचा हा दगड आहे. समुद्रकिनारी फिरताना हा दगड सापडल्यानं दगडाला माती लागली होती. त्यामुळे तो धुण्यासाठी पाण्यात टाकला असता दगड पाण्यावर तरंगू लागला.
याची माहिती शोधली असता श्रीलंकेत रामसेतू बांधण्यासाठी जो दगड वापरण्यात आला तो दगड याच प्रकारातला असल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारचे दगड दक्षिण भारतासोबतच श्रीलंका आणि जपान या भागातही आढळून येतात.
ज्वालामुखीच्या लाव्हेचा पाण्याशी संयोग होऊन अशा प्रकारचे दगड निर्माण होतात अशी माहितीही रोगे यांना मिळाली आहे.