सांगली : वडिलांच्याच मोटारीखाली चिरडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगलीजवळच्या हरिपूरमध्ये ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. शिवम गंगथडे असं मृत मुलाचं नाव असून तो अवघा सव्वा वर्षांचा होता.


शिवमचे वडील सतपाल गंगथडे यांनी काल (27 नोव्हेंबर) संध्याकाळी शिवमला गाडीत बसवून परिसरातून फिरवून आणलं. फिरवून आणल्यानंतर त्यांनी शिवमला घरात सोडले आणि कामानिमित्त ते बाहेर पडले.

मात्र शिवम हा घरात न जाता वडिलांच्या पाठोपाठ आला. घरातील लोकांचंही याकडे लक्ष नव्हतं. याच वेळी सतपाल गाडी मागे घेत होते. त्यावेळी मागून आलेला शिवम त्यांना दिसला नाही. शिवमला गाडीचा जोरदार धक्का बसला आणि यात त्याचा मृत्यू झाला.