मुंबई : सोशल मीडियावर रोज नवनवीन फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात अनेक धक्कादायक व्हिडीओ असतात. तर काही व्हिडीओमधून चांगला सामाजिक संदेश दिला जातो. पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यातून स्त्री-पुरुष समानते विषयी सांगणाऱ्यांना एक वेगळा मेसेज दिलाय.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक चिमुरडा चक्क घरात पोळ्या लाटताना दिसत आहे. त्याने पोळ्या लाटण्याचे कसब असं काही आत्मसाद केलं आहे की, ज्यामुळे महिला वर्गालाही अश्चर्याचा धक्का बसेल. कारण या चिमुरड्याने लाटलेल्या पोळ्या एखाद्या सुगरणीने लाटलेल्या पोळ्यांप्रमाणे गोलाकार आहेत.

या व्हिडीओतील मुलाविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही. पण सोशल मीडियात हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे.