चंद्रपूरः लग्नाच्या ऐन एक दिवसाआधी नवरदेव मुलगा गायब झाल्याची अजब घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात समोर आली आहे. सरदार पटेल वॉर्डात राहणाऱ्या या नवरदेवाचे हिंगणघाट येथील मुलीशी लग्न ठरलं होतं. त्यासाठी सगळी तयारी झाली होती. मात्र दाढी करण्याच्या बहाण्याने तो मुलगा बाहेर गेला होता. तेव्हापासून गायब झाला आहे. मुलाचे फोन बंद असल्याने सगळी वऱ्हाडी चिंतेत आहे. तर दुसरीकडे पोलीसही त्याचा शोध घेताहेत.


Sovereign Gold Bond Scheme: फक्त 5197 रुपयांत सरकारकडून खरेदी करा सोनं, जाणून घ्या कसं?


घरात लग्न असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. तर विविध धार्मिक विधीमध्ये वऱ्हाडी मग्न होते. लग्नाची झालेली पूर्ण तयारी आणि विविध व्यवस्था पाहण्यात नातेवाईही बिझी होते. याच दरम्यान नवरदेव गायब होणार याची कोणालाही कल्पना नव्हती. सर्वत्र आनंद उत्साहाचा वातावरण असताना ही घटना घडल्याचे उपस्थितांना धक्काच बसला आहे. मुलाने कोणालाही काहीच समजू न देता साधारणपणे मी दाढी करुन येतो म्हणून बाहेर निघाला. आता ज्याचं लग्न आहे त्याला सलूनमध्ये जाएचे म्हटल्यावर कोणी कशाला संशय घेणार. त्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्षही दिले नाही. मात्र मुलाला जाऊन पुष्कळ वेळ झाला असल्याने त्याला फोन करण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा फोन बंद आला. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली. त्यानंतर सर्वांनी मुलाचा शोध सुरु केला.


OBC Reservation : 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षणाचा फैसला लांबणीवर, सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत करणार


सलून आणि गावात सगळीकडे शोध घेतल्यावरही मुलगा सापडला नसल्याने नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली. ज्याच्या लग्नासाठी एवढी तयारी केली आणि तोच गायब झाल्यावे वऱ्हाड्यांचीही चिंता वाढली आहे. तर सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे.