Dunzo App Crime :  डंझो या ऑनलाईन डिलिव्हरी (Crime) ॲप या कंपनीमध्ये नोकरीचे (Online job) आमिष दाखवून 26 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील घटना घडली आहे.  बलात्कार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडित महिलेकडून 1 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


आरिफ खान, रवी आणि रियाज अशा तीन जणांनी नावं आहेत. या तीन जणांविरोधात पोलिसांनी बलात्कार, खंडणी यासारखे गुन्हे दाखल केले आहेत. डंझो ही सामानाची डिलीवरी करणारी ऑनलाइन कंपनी सध्या भारतातील अनेक शहरात कार्यरत आहे. त्यावरुन अनेक पुणेकर सामानाची डिलीव्हरी करतात. पुण्यातील शेकडो नागरिक या अॅपचा वापर करतात. 


मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ खान याने पीडित महिलेला तो तिच्या पतीचा मित्र आहे, असं सांगून डंझो या ऑनलाईन डिलिव्हरी ॲपमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगितले. डिलिव्हरी गर्ल म्हणून काम लावून देतो असे सांगत आरिफने पीडित महिलेला एक डिलिव्हरी करायची आहे यासाठी बोलावले. त्यानंतर त्याने त्या महिलेला एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छे विरोधात शरीर संबंध ठेवले. या सगळ्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर फोटो व्हायरल करेल अशी धमकी यातील दुसरा आरोपी रवीने त्या महिलेला दिली आणि तिच्याकडून 1 लाख रुपयाची खंडणी ही मागितली. तसेच यातील तिसऱ्या आरोपीने महिलेला वारंवार धमकावले. या सगळ्या त्रासला कंटाळून पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. हा सगळा प्रकार जुलै 2022 ते ऑगस्ट 2022 दरम्यान घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



फोटो व्हायरल करण्याची धमकी...


या अॅप वरुन महिलेला डिलिव्हरीच्या कामासाठी घरी बोलावण्यात आले. त्यानंतर त्या महिलेवर अतिप्रसंग केला. महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र नराधम ऐकायला तयार नव्हता. त्याचदरम्यान त्याने महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून घेतले. शिवाय दुसऱ्या मित्राला बोलावून घेतलं. त्या मित्राने तिच्यावर खंडणीसाठी जबरदस्ती केली आणि 1 लाख रुपयाची मागणी केली. तिघांनी मिळून अश्लील फोटो व्हायरल करणयाची धमकी दिली. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.