मुंबई : परिवहन खात्याने एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना हक्काच्या रजेसोबत आता 3 महिने अतिरिक्त पगारी प्रसूती रजा मिळणार आहे. म्हणजेच 6 महिने हक्काची रजा आणि त्यासोबत 3 महिने अतिरिक्त रजा, अशी एकूण 9 महिन्यांची प्रसूती रजा आता एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मातृत्त्व कोणत्याही स्वरुपात हिरावून घेतलं जाऊ नये, त्याचा सन्मान झालाच पाहिजे, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं एसटी महामंडळाने म्हटलं आहे.
एसटी मंहामंडळाने या निर्णयाचं परिपत्रक जारी केलं आहे. एसटीतील महिला कर्मचाऱ्यांनीही सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं.
सरकारी नियमानुसार एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची प्रसूती रजा दिली जाते. ती रजा कधी घ्यायची हा संबंधित महिला कर्मचाऱ्याचा निर्णय असतो. बहुतांश महिला मुलाच्या जन्मानंतर बालसंगोपनासाठी या रजेचा वापर करतात. मात्र प्रसूतीपूर्व रजा मिळत नसल्याने एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना गरोदर अवस्थेतच प्रवास करावा लागतो. त्यामुळे आता अतिरिक्त तीन महिन्यांची प्रसूती रजा देण्यात आल्याने एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना आता 9 महिने प्रसूती रजा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Aug 2017 08:55 PM (IST)
सरकारी नियमानुसार एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची प्रसूती रजा दिली जाते. यामध्ये आता तीन महिन्यांची अतिरिक्त प्रसूती रजा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -