बागलाणच्या शेळीजवळ पहाटेच्या वेळेस अज्ञात वाहनाने अॅपे रिक्षाला धडक दिली आणि यात सात जणांनी जीव गमावला.
आज पहाटेच्या वेळेस मालेगावकडून सटाण्याकडे अॅपे रिक्षा जात होती. त्या अॅपे रिक्षामध्ये सातजण होते. यात काही व्यावसायिकही होते, जे सामान घेऊन सटाण्याला जात होते. अपघतात सातही जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातस्थळी पोलीस पोहोचले असून, तपास सुरु केला आहे.
बातमीचा व्हिडीओ :