कोल्हापूर : कोल्हापुरातील भेंडवळेमध्ये वारणा नदीच्या पात्राशेजारील एका झाडावर तरुणीचा मृतदेह लटकताना आढळून आला आहे. या मृत तरुणीचं अंदाजे वय 20 ते 25 वर्ष असून तिच्या अंगावर हिरव्या रंगाचा टॉप आणि निळा पायजमा आहे.

 

मुसळधार पावसामुळं हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा आणि वारणा नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना स्थलांतरित करण्यात आलं होतं. दोन दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं नदीपात्रातील पाणी कमी होत आहे.

 

काही शेतकरी नदीकाठावरून जात असताना त्यांना पात्राशेजारील झाडावर तरुणीचा मृतदेह लटकताना आढळून आला. हा मृतदेह नदीच्या पाण्यातून वाहत आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.