ट्रक चालकाला मारहाणीचा व्हिडीओ नागपूरच्या वडधामना परिसरातील आंध्रा-कर्नाटक रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या कार्यालयातील असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला होता. त्यानंतर पीडित ट्रक चालकाच्या तक्रारीवरुन वाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तरुणाला छतावरील पंख्याच्या हुकला दोरीने लटकवून लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोबतच सदर तरुणासोबत अमानवीय कृत्य देखील केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. माहितीनुसार, संबंधित ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या मालकाने म्हणजेच अखिल पोहनकरने चार दिवसांपूर्वी पीडित ट्रक ड्रायव्हर विक्की सुनील आगलावे (23) ला ट्रकमध्ये लोड केलेले साहित्य थिरुवनंतपुरमला पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती. त्यासाठी विक्की आगलावेला रस्त्यातील टोल आणि इतर खर्चासाठी 35 हजार रोख रक्कम दिली होती. शिवाय 12 हजार रुपयांचे डिझेलही भरून दिले होते. मात्र विक्की आगलावेने ट्रक थिरुवनंतपुरमला न नेता नागपुरातच सर्व पैसे खर्च केले. शिवाय ट्रकमधले 12 हजारांचे डिझेलही कुणालातरी विकून मालकासोबत दगाबाजी केली, असा आरोप मालकाने केला आहे.
या सगळ्या प्रकारानंतर अखिल पोहनकरला त्याच्या चालकाच्या या कृत्याचा इतका राग आला की चार दिवसाने विक्की हाती लागताच त्याला कार्यालयात छताला उलटं लटकवून जबर मारहाण केली. तिथे उपस्थित इतर लोकांनी या कृत्याचे व्हिडीओ बनविले. नंतर हे व्हिडीओ व्हायरल होऊन पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करत अखिल पोहनकर, अमित ठाकरे, प्रकाश चवरे, श्रीराम इकनकर आणि चंद्रशेखर परसमोड या पाच आरोपीना अटक केली आहे.
पब्जी खेळण्यास विरोध केल्याने महिलेला ठाकुर्लीमध्ये मारहाण