मुंबई : कोपर्डीच्या निर्भयाप्रकरणाचा निकाल ताजा असतानाच आता राज्यातील महिलांसंबधी नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित असल्याचं राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे बेपत्ता नागरिकांच्या यादीत वर्षभरात राज्यातील तब्बल 49 हजार महिला बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे.
देशभरातून गेल्या वर्षभरात ५ लाख ४९ हजार नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यापैकी २ लाख २९ हजार ३८१ नागरिकांचा शोध घेण्यास तपास यंत्रणेला यश आले. तर अजूनही ३ लाख १९ हजार नागरिक बेपत्ताच्या यादीत आहेत. यामध्ये १ लाख ७४ हजार ८१६ महिलांचा समावेश आहे.
पश्चिम बंगालपाठोपाठ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. काही जण स्वतहून पळून जातात, कोणी प्रेमभंगातून घरं सोडतं तर कुणी भविष्य घडवण्यासाठी बाहेरचा रस्ता धरतं.
महाराष्ट्रातून वर्षभरात तब्बल 49 हजार महिला बेपत्ता
एबीपी माझा वेब टीम Updated at: 01 Dec 2017 08:44 PM (IST)