Mumbai Crime News : मुंबईमध्ये (Mumbai) एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात एका नामांकित शाळेमध्ये महिला कर्मचाऱ्याकडून 4 वर्षीय मुलीची विनयभंग केल्याची घटना घडली आहे. 4 वर्षीय मुलीची आजी शाळेतून घरी घेऊन गेल्यावर घरात मुलीचे कपडे बदलताना तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. यानंतर आजीने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. गोरेगाव पोलिसांनी आजीच्या तक्रारीवरून शाळेतील एका महिला कर्मचाऱ्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्या महिलेला अटक केली आहे.
शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांच्या ताब्यात
अटक केलेल्या महिलेकडून किती दिवसापासून या मुलीची विनयभंग आणि टॉर्चर केले जात होते या संदर्भात गोरेगाव पोलीस शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरा ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहेत. पण घटनेमुळं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या: