पंढरपूर : अकलूज येथील सिया मॅटर्निटी अॅण्ड सर्जिकल होमवरील छापेमारीत अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. हे हॉस्पीटल 4 जिल्ह्यातील भ्रूणहत्येचे केंद्र बनल्याचे आता तपासात समोर येऊ लागले आहे.

अकलूज येथील डॉ. तेजस गांधी आणि डॉ. प्रीती गांधी यांच्या हॉस्पिटलवरील छाप्यात 36 गर्भपात झाल्याचे उघड झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. यात सातारा जिल्ह्यातील एका सीआरपीएफच्या जवानाने पहिल्यांदा तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला होता.

यानंतर सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांच्या पुढाकाराने सिया हॉस्पिटलवर छापा टाकला. यात मे 2016 ते 24 ऑगस्ट 2017 या काळात 36 गर्भपाताचे पुरावे या ठिकाणी मिळाले. यात सातारा, सोलापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्यातील महिलांनी या ठिकाणी येऊन गर्भपात करून घेत असल्याचे समोर आले आहे.

याशिवाय 36 पैकी फक्त 5 महिलांच्या सोनोग्राफी सिया हॉस्पिटलमध्ये केल्या होत्या. तर उर्वरित 31 महिलांनी सोनोग्राफी कोठे केली याचाही तपस पोलीस करत आहेत. या प्रकरणी सर्व सोनोग्राफी केंद्रांच्या चौकशीनंतर हा गर्भपाताचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

अकलूजमध्ये 36 महिलांचा गर्भपात करणारं डॉक्टर दाम्पत्य अटकेत