नंदुरबार : लहान मुले पळवण्याच्या संशयावरून जमावाने तीन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना शहादा तालुक्यातील म्हसावद येथे घडली आहे.

मारहाण करण्यात आलेल्या तीनही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परंतु आक्रमक झालेल्या जमावाने पोलीस स्थानकाच्या आवारातच संशयितांची इनोव्हा गाडीच जाळून टाकली. तसंच या संशयित आरोपींना जमावाच्या ताब्यात देण्यात यावं, अशी मागणीही संतापलेल्या ग्रामस्थांनी केली.

वातावरणात तणाव निर्माण झाल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक म्हसावदकडे पाठवण्यात आली आहे.

अलिकडे मराठवाड्यातही लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याच्या संशयावरून मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.