हे तिघे आज आरोपपत्र घ्यायला आले होते. त्यावेळेस कोर्टानं त्यांना अटक करण्याचा आदेश पोलिसांना दिले. अटकेनंतर या तिघांना 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
बाळगंगा धरणाचा खर्च वाढवून तब्बल 92 कोटी 63 लाख 42 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात सहा अधिकाऱ्यांसह 11 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण:
यामध्ये 6 सरकारी अधिकारी आणि एफ. ए. कन्स्ट्रक्शनच्या 5 जणांचा समावेश होता. बाळगंगा धरणाचं कंत्राट मिळवताना एफ. ए. कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. यामध्ये काही सरकारी अधिकाऱ्यांनीही एफ.ए कन्स्ट्रक्शनला मदत केली असून धरणाच्या बांधकामाचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आल्यानं धरणाची किंमतही फुगल्याचं अनेक कागदपत्रांच्या आधारे समोर आलं होतं.
एसीबीच्या तक्रारीनंतर राज्यभर छापेमारी सुरु
सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीने तक्रार दाखल केल्यानंतर राज्यभर छापेमारी करण्यात आली होती. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगडमधील 16 ठिकाणी महाराष्ट्र लाचलुचपत विभागाने छापे मारले होते.
संबंधित बातम्या: