29th June In History: दरवर्षी 29 जून हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये सांख्यिकीच्या महत्त्वाबाबत आजच्या दिवशी जनजागृती केली जाते. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना दैनंदिन जीवनात आणि नियोजन आणि विकास प्रक्रियेत आकडेवारीच्या महत्त्वाची जाणीव करून देणे हा आहे. भारतातील प्रख्यात सांख्यिकीशास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 


2001 : पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना 'नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार' जाहीर


2007 : अॅपल कंपनीचा पहिला मोबाईल बाजारात आला


आजचा दिवस अॅपल मोबाईल कंपनीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 29 जून 2007 रोजी अॅपल कंपनीचा पहिला मोबाईल बाजारात आला. अॅपलचे निर्माते स्टीव्ह जॉब्स यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील मॉस्कोन सेंटरच्या स्टेजवरून जानेवारी 2007 मध्ये आयफोनची घोषणा केली होती. पहिला iPhone किंवा iPhone 1 हा त्यावेळी बाजारात 499 डॉलर्स इतक्या किमतीत मिळत होता. जेव्हा iPhone 13 बाजारात आला तेव्हा त्याची किंमत 999 डॉलर्स इतकी होती. या iPhone नंतर Apple ही अमेरिकेची तीन ट्रिलियन कंपनी बनली.


1893 : भारतीय संख्याशास्त्राचे जनक पीसी महालनोबिस यांचा जन्म


प्रशांत चंद्र महालनोबिस उर्फ पीसी महालनोबिस (PC Mahalanobis) हे एक प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 29 जून 1893 रोजी कोलकाता येथे झाला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा त्यांनी तयार केला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, ते नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळाचे सांख्यिकी सल्लागार बनले आणि औद्योगिक उत्पादनात वेगाने वाढ करून बेरोजगारी संपवण्याचे सरकारचे मुख्य उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी एक योजना तयार केली.


महालनोबिस यांचीची कीर्ती महालनोबिस डिस्टन्स (Mahalanobis Distance) या त्यांनी मांडलेल्या थेअरीमुळे आहे. हे त्यांनी सुचविलेले सांख्यिकीय उपाय आहे. त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली.


प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या आर्थिक नियोजन आणि सांख्यिकी विकासाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाच्या स्मरणार्थ, भारत सरकार दरवर्षी 29 जून हा त्यांचा जन्मदिन 'सांख्यिकी दिन' (National Statistics Day) म्हणून साजरा करते. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये प्रा. महालनोबिस यांच्या भूमिकेबद्दल जनजागृती आणि विशेषत: तरुण पिढीला प्रेरित करणे हा आहे.


1966 : दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार


1995 : दक्षिण कोरियातील सेऊल येथे 'सँपूंग डिपार्टमेंटल स्टोअर'ची इमारत कोसळून 502 जण ठार तर 937 जखमी झाले.


2008: थॉमस या जगातील पहिल्या गरोदर पुरुषाने मुलीला जन्म दिला.


2011: भारताला मानवी तस्करी वॉच लिस्टच्या यादीतून काढून टाकण्यात आले. तब्बल सहा वर्षानंतर अमेरिकेने भारताला मानवी तस्करी वॉच लिस्ट यादीतून काढून टाकले.


2013: कॅलिफोर्नियाने समलिंगी विवाहावरील बंदी उठवली.


2014: सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज जिंकली.


2014: अबू बकर अल-बगदादीने ISIS म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवीन खलिफाची स्थापना करून स्वतःला खलीफा असे नाव दिले.