नागपूर : गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर गावांमध्ये असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महानुभव पंथाच्या वतीने फिरत्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि साठ साधकांचा हा समूह जळगाव मध्ये काही दिवस राहून गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर या ठिकाणी असलेल्या महानुभव पंथाच्या आश्रमात आले होते.
गेल्या दोन महिन्यापासून हे साधक मंडळी याच आश्रमात धार्मिक कार्यक्रम घेत होते. अचानक यातील काही लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने ते गेवराईच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले. मात्र त्यांना कोरोनाचे लक्षण असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर खासगी डॉक्टरांनी तात्काळ गेवराईच्या आरोग्य अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली आणि त्यानंतर आरोग्य अधिकारी संजय कदम यांनी तात्काळ डॉक्टरांची एक टीम या आश्रमात पाठवून या साठ साधकांच्या अँटीजन टेस्ट केल्या. यामध्ये तब्बल 29 जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे आता या सर्व साधकांना याच आश्रमात होम आयसोलेट करण्यात आल आहे यामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की, हे 60 साधक या ठिकाणाहून पुढे आता आळेफाटा या ठिकाणी असलेल्या आश्रमात जाणार होते.
पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही जणांना कोरोनाची लक्षणं असल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान राज्यातील शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील विविध भागातील शेकडो विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. वाशिम, सोलापूर, सातारा, लातूर अशा विविध भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
WEB EXCLUSIVE | कोरोना चाचणीनंतर कसा तयार होतो अहवाल?