25 February Headlines : पुण्यातील कसबा पेठेतील रविवार पेठ गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकरांनी केलाय. या प्रकारात पोलिस देखील सहभागी असून याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपती समोर उपोषणाला बसणार आहेत. याशिवाय आजपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचं शिवगर्जना अभियान सुरू होणार. 25 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान शिवसेनेचे नेते, उपनेते यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी प्रत्येक मतदार संघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत.


रविंद्र धंगेकरांच कसबा गणपती समोर उपोषण 
भारतीय जनता पक्षाकडून पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप करत असल्याचा रवींद्र धंगेकर यांनी आरोप केलाय. कसबा पेठेतील रविवार पेठ गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू आहे. या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी असल्याचा धंगेकरांचा आरोप आहे. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपती समोर सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला सुरवात करणार आहेत. 


नवी मुंबईत  एमआयएमचं पहिल राष्ट्रीय अधिवेशन  
 
एमआयएमचं पहिल राष्ट्रीय अधिवेशन दोन दिवस नवी मुंबईत होत आहे. अधिवेशनाला आमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्यासह देशातील महत्वाचे नेते हजेरी लावणार आहेत. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ओवेसी पक्षातील पदाघधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. सकाळी 9.30 वाजता असदुद्दीन ओवेसी यांची रामाडा हॉटेल इथं पत्रकार परिषद होईल. सायंकाळी 7 वाजता मुंब्र्यात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून ओवेसी लोकांशी संवाद साधणार आहेत. 2
 
 शिवसेनेच्या ठाकरे गटाचं शिवगर्जना अभियान
 
आजपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचं शिवगर्जना अभियान सुरू होणार. 25 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान शिवसेनेचे नेते, उपनेते यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी प्रत्येक मतदार संघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेची झालेली पडझड पहाता ठाकरेंकडून थेट जनतेला साद घालायला सुरूवात केलीय. या अभियानात ठाकरे गटाकडून शिंदे गटाला थेट लक्ष केल जाईल. पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यापासून ठाकरेंकडून थेट ग्रामीण पातळीवर संवाद साधायला सुरूवात केलीय.  


 काँग्रेस अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
 
रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सकाळी 10 वाजता काँग्रेस अध्यक्षांचं भाषण होणार असून त्यानंतर लगेच सोनिया गांधींचं भाषण होणार आहे.   
 
 सुकेश चंद्रशेखरच्या खटल्याची सुनावणी
 
मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरच्या खटल्याची आज राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीत सुकेश चंद्रशेखर याने आम आदमी पार्टीला (आप) 60 कोटी रुपये दिल्याचे न्यायालयाला सांगितले होते आणि ही बाब दिल्लीच्या राज्यपालांना लेखी दिली आहे, असं सुकेशने सांगीतलं होत. सुकेशवर दोनशे कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे
  
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कर्नाटकी 'बारिसू कन्नड दिम दिमवा' या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन
 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकी 'बारिसू कन्नड दिम दिमवा' या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करतील. तसचं  यावेळी पंतप्रधान उपस्थित जनतेला संबोधित करणार आहेत. 


दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सोलापुरात दोन दिवसीय कार्यक्रमांचे उद्धघाटन 
 
सोलापूर - दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सोलापुरात दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सकाळी 10 वाजता होणार आहे. दलित पॅंथरचे सहसंस्थापक राहिलेल्या अर्जुन डांगळे, प्रसिद्ध छायाचित्रकार सुधाकर ओलवे, दत्ता गायकवाड, लक्ष्मण यादव यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर सोलापुरातील पॅंथर चळवळीतील शिलेदारांचा सन्मान करण्यात येणार आहे.  
 
नितीन गडकरी परभणी जिल्हा दौऱ्यावर


केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत. परभणी जिल्ह्यातील पाथरी, सेलु आणि परभणी असोला इथल्या 3 महामार्गाच्या विकास कामाचे भूमिपूजन मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.